Bird flu Bird flu in india avian influenza strain Things you need to know | कोरोनाप्रमाणे बर्ड फ्लूसुद्धा स्ट्रेन बदलणार? माहामारी येण्याची शक्यता कितपत? जाणून घ्या फॅक्ट्स

कोरोनाप्रमाणे बर्ड फ्लूसुद्धा स्ट्रेन बदलणार? माहामारी येण्याची शक्यता कितपत? जाणून घ्या फॅक्ट्स

भारतात कोरोना व्हायरसमुळे लोक आधीपासूनच चिंताजनक स्थितीत  आहेत. आता बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रसारात लोकांमध्ये आणखी भीतीचं वातावरण तयार झालेलं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, गुजरात, हरियाणा, उत्तरप्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्ये पक्ष्यांच्या नमुन्यांमध्ये हा व्हायरस असल्याची पुष्टी झाली आहे. बर्ड फ्लूचा वाढता प्रसार पाहता पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांना सावधान राहण्याचे आवाहन केलं आहे. साधारणपणे बर्ड फ्लू ला एव्हियन इंफ्लूएंजा हे नाव सुद्धा आहे.

हा व्हायरस कधी पक्ष्यांद्वारे पक्ष्यांपर्यंत तर कधी पक्ष्यांकडून माणसांपर्यंत पोहोचतो. देशभरात  15 दिवसात बर्ड फ्लूमुळे पाच  लाखांपेक्षा अधिक पक्ष्यांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. केरळने या संकटाला आपत्ती घोषित केली असून ज्या पद्धतीने हा आजार पसरत  आहे ते पाहता माहामारी पुन्हा येईल का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

2019 मध्ये ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. ज्यामध्ये बर्ड फ्लू माहामारी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यावेळी संशोधकांनी सांगितले की या शोधामुळे व्हायरस महामारी होण्याची शक्यता सूचित करते. 2006 मध्ये तुर्कीमध्ये बर्ड फ्लूचा झपाट्याने प्रसार होण्याची बातमीही आली. यावर्षी जानेवारीमध्ये एच 5 एन 1 (बर्ड फ्लूचा एक स्ट्रेन) विषाणूमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला तर 13 लोकांना हा आजार असल्याची खात्री झाली. त्यावेळी, यूएसएच्या एका संस्थेने असा अंदाज वर्तविला होता की तुर्कीमध्ये बर्ड फ्लू रोग हा माहामारीचे रूप घेऊ शकतो आणि यामुळे शेजारील देशांना धोका आहे. तथापि, असे काहीही झाले नव्हते.

कोणता स्ट्रेन जास्त धोकादायक?

H5N1, H5N8, H7N3, H7N7, H7N9 आणि H9N2 इ. यासह बर्ड फ्लूचे सुमारे 15 ते 16 स्ट्रेन आहेत. मानवांमध्ये बर्ड फ्लूचा एच 7 एन 9, एच 7 एन 7 आणि एच 9 एन 2 स्ट्रेन्सचा संसर्ग क्वचितच दिसून आला आहे, एच ​​5 एन 1 स्ट्रेन बहुतेक मानवांना संक्रमित करते आणि ते खूप धोकादायक देखील आहे. दिल्लीतही बर्ड फ्लूचा एच 5 एन 8 स्ट्रेन सापडल्याची खात्री झाली आहे. अलर्ट! आता भारतातही वेगानं होतोय बर्ड फ्लूचा प्रसार; जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

भारतात बर्ड फ्लूची पहिली केस कधी समोर आली?

बीबीसीच्या वृत्तानुसार, २००६ मध्येही महाराष्ट्र राज्यात कोंबडीमध्ये बर्ड फ्लू विषाणू आढळून आले होते. जगातील अनेक देशांपैकी या आजाराचा विषाणू पहिल्यांदाच भारतात आढळला. त्यानंतर, दरवर्षी बर्ड फ्लूच्या केसेस कोणत्या ना कोणत्या राज्यात आढळल्या. भय इथले संपत नाही! जपानमध्ये सापडला कोरोनाचा नवा स्ट्रेन; आरोग्य मंत्रालयाची महत्वाची माहिती

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bird flu Bird flu in india avian influenza strain Things you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.