शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

आता 'स्वदेशी' कंपनीने मागितली कोरोना लसीकरणाची परवानगी; केंद्र कोणाला प्राधान्य देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 14:28 IST

CoronaVirus Vaccine News & Latest Updates: फायजर इंक आणि सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियानंतर आता हैदराबादमधील फार्मास्युटिकल कंपनी भारत बायोटेकनेही कोरोना लसीच्या आपत्कालीन स्थितीतील वापरासाठी परवानगी मागितली आहे. 

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी गेल्या  १० ते ११ महिन्यांपासून संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहे. कोरोनाची लस लवकरात लवकर तयार व्हावी यासाठी भारतासह अनेक देशांच्या सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. फायजर इंक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानंतर आता हैदराबादमधील फार्मास्युटिकल कंपनी भारत बायोटेकनेही कोरोना लसीच्या आपत्कालीन  स्थितीतील वापरासाठी परवानगी मागितली आहे. 

भारत बायोटेकने केंद्रीय औषधी नियामक मंडळाकडे या लसीच्या परवानगीसाठी निवेदन दिलं आहे. भारत बायोटेक ही लसीसाठी परवानगी मागणारी तिसरी कंपनी आहे. देशभरातील लसीच्या चाचण्यांचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यावर कंपनीचा भर होता . कोवाक्सिन SARS-Cov-2 ची इनअॅक्टिव्हेटेड स्‍ट्रेनमधून तयार केली जाणारी ही लस आहे. २०२१ च्या सुरूवातीच्या तीन महिन्यात ही लस भारतातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार, अशी माहिती भारत बायोटेककडून देण्यात आली होती. आता केंद्र सरकारकडून कोणत्या लसीच्या आपत्कालीन  वापरासाठी परवानगी मिळणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. 

कोणत्या लसीला सगळ्यात आधी परवानगी मिळणार?

अधिकाऱ्यांनी  दिलेल्या माहितीनुसार कोवॅक्सिन ही लस भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांच्या सहयोगाने भारतात  तयार केली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चार डिसेंबरला एक सर्वपक्षिय बैठक घेतली होती. या बैठकीत कोरोनाची लस काही आठवड्यात तयार  उपलब्ध होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याच दिवशी संध्याकाळी अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी फायजरने भारतील केंद्रीय औषधी नियामक मंडळाकडून लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली होती. याआधीही  या कंपनीला ब्रिटन आणि बहरिनमध्ये या प्रकारची परवानगी मिळाली होती.

आनंदाची बातमी! 'या' देशात आजपासून सामान्यांना मिळणार कोरोनाची लस; भारतातही तयारीला सुरूवात

दोन विदेशी एक स्वदेशी कंपनीने लसीच्या वापरासाठी निवेदन दिलं आहे. भारत बायोटेक, सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया आणि फायजरच्या लसीच्या आपत्कालीन वापराच्या निवेदनांवर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) विशेषज्ञ समितीद्वारे विचार केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे मुल्यांकन केल्यानंतर लसीला परवानगी देण्यास विचार केला जाईल. जुलैपर्यंत कसे तयार होणार ६० कोटी लसीचे डोस?; 'या' ४ लसींनी दाखवला आशेचा किरण

सीरमने Covishield लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मागितली परवानगी

दरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लस "कोविशील्ड" (Covishield) च्या आपत्कालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) अर्ज केला आहे. असा अर्ज करणारी ही स्वदेशी पहिली लस होती. सीरम संस्थेला परवानगी मिळाली तर भारतातील ही पहिली स्वदेशी लस ठरू शकेल. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या निर्माण झालेली वैद्यकीय गरज आणि लोकांचं हित अशी कारणं सीरम इन्स्टिट्यूटने डीजीसीआयकडे सोपवण्यात आलेल्या अर्जात दिली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्यIndiaभारत