जुलैपर्यंत कसे तयार होणार ६० कोटी लसीचे डोस?; 'या' ४ लसींनी दाखवला आशेचा किरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 12:27 PM2020-12-07T12:27:01+5:302020-12-07T12:52:39+5:30

CoronaVirus News & latest Updates: कोवॅक्सिनला जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटापर्यंत आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळू शकते.

CoronaVirus News : Four corona vaccines india putting its hopes on | जुलैपर्यंत कसे तयार होणार ६० कोटी लसीचे डोस?; 'या' ४ लसींनी दाखवला आशेचा किरण

जुलैपर्यंत कसे तयार होणार ६० कोटी लसीचे डोस?; 'या' ४ लसींनी दाखवला आशेचा किरण

Next

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या दोन लसी जानेवारीपर्यंत उपलब्ध होऊ शकतात. एप्रिल २०२१ पर्यंत देशात चार वेगवेगळ्या लसी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जुलैपर्यंत ३० कोटी लोकांना लस देण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी लसींचा पुरवठा मुबलक प्रमाणात असणं गरजेचं आहे.  दरम्यान कोविशिल्डच्या आपातकालीन वापरासाठी निवेदन देण्यात आलं आहे. कोवॅक्सिनला जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटापर्यंत आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळू शकते. पुढच्या वर्षाच्या मध्यापर्यंत देशात चार लसी उपलब्ध होऊ शकतात. असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने देशात पहिल्यांदाच लसीच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. SII ने एस्‍ट्राजेनेकासह कोविशिल्डचे १०० कोटी डोस तयार करण्याचा करार केला आहे. भारत बायोटेकसुद्धा शेवटच्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाल्यानंतर आपातकालीन वापरासाठी निवेदन करणार आहे. फाइजरने सगळ्यात आधी लसीच्या आपातकालीन वापरासाठी निवेदन दिले होते.  या लसीच्या लसीकरणाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.  प्राथमिकतेच्या आधारावर या लसीकरणाअंतर्गत डोस उपलब्ध होऊ शकतात. रशियाची स्पुटनिक व्ही ही लस अप्रिलपर्यंत लॉन्च होऊ शकते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार पुढच्या पाच ते सहा महिन्यात कोविशिल्डचे जवळपास ४० कोटी डोस तयार होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. ज्या ३० कोटी लोकांना सगळ्यात आधी लस दिली जाणार आहे. त्यांच्या लसीकरणासाठी  ६० कोटी डोसची आवश्यकता भासू शकते. स्पुटनिक व्ही आणि कोवॅक्सिनच्या वापराला मान्यता मिळाल्यास जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध  होऊ शकतात. फायजरच्या लसीला कोल्ड स्टोरेजच्या समस्या जाणवत आहेत. ७० डिग्री सेल्सियस तापमानावर  लसीची साठवणूक करावी लागते.

खुशखबर! Molnupiravir या औषधाने केवळ २४ तासात बरे होणार कोरोनाचे रुग्ण, तज्ज्ञांचा दावा

कोविशिल्डला युकेमध्ये झालेल्या एका चाचणीच्या आधारावर भारतात मंजूरी दिली जाऊ शकते. फायजरच्या लसीची भारतात कोणतीही चाचणी  झालेली नाही. भारत बायोटेकची कोवॅक्सिन तिसऱ्या टप्प्यात असून स्पुटनिक व्ही लसीच्या चाचणीची जबाबदारी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडे आहे. कॅडिला हेल्थकेअरकडून झायडस कँडिला या लसीची चाचणी सुरू आहे. 'या' उपायाने ४५ टक्क्यांनी कमी होतोय जीवघेण्या व्हायरसचा धोका, संशोधनातून खुलासा

Web Title: CoronaVirus News : Four corona vaccines india putting its hopes on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.