तुळशीची पाने वजन घटवण्यासाठी रामबाण! चरबी अक्षरश: विरघळते, 'हे' गंभीर आजारही राहतात दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 17:38 IST2021-08-17T16:31:38+5:302021-08-17T17:38:27+5:30
पान खाल्याने वजन कमी होते. तसेच तुळशीच्या पानांमुळे तुमच्या शरीरातील चरबीही कमी होऊ शकते. कशी? घ्या जाणून

तुळशीची पाने वजन घटवण्यासाठी रामबाण! चरबी अक्षरश: विरघळते, 'हे' गंभीर आजारही राहतात दूर
तुळशीचं झाडं प्रत्येकाच्या घरी असते. त्याची आपण रोज त्याची पुजाही करत असतो. मात्र, या झाडाचे आर्श्चकारक फायदे आहेत. .तुळशीच्या पानांमध्ये काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्याला बऱ्याच रोगांपासून वाचवू शकतात. याने शरीराची प्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. तुळशीचे पान खाल्याने वजन कमी होते. तसेच तुळशीच्या पानांमुळे तुमच्या शरीरातील चरबीही कमी होऊ शकते.
तुम्ही तुळशीची पाने अशीच चावूनही खाऊ शकता. मात्र काही लोकांना तुळशीची पाने अशीच चावून खाणे कठीण जाते. अशावेळी तुम्ही तुळशीची ५ ते ६ पानं पाण्यात घालून उकळा. यात तुम्ही तुळशीच्या बियाही टाकू शकता. यामध्ये काही पुदिन्याची पान व लिंबाचा रस टाका. आता हे मिश्रण थंड करुन प्या. तुम्ही तुळशीचा चहाही पिऊ शकता. तोही अत्यंत फायदेशीर आहे.
डॉक्टर अबरार मुल्तानी यांनी झी न्युज हिंदीला दिलेल्या माहितीत तुळशीच्या पानांमुळे वजन कमी होण्यासाठी कसा फायदा होतो हे सांगितलेले आहे...
शरीरात अथवा पोटावर अतिरिक्त चरबी वाढल्यामुळे मेटाबॉलिज्मचा वेग कमी होतो. त्यामुळे शरीरातील फॅटचा उपयोग योग्य पद्धतीने केला जात नाही तसेच हे फॅट एकत्रित होते. मात्र तुळशीच्या पानांच्या सेवनाने शरीरातील मेटाबॉलिज्मचा वेग वाढतो.
पचन शक्ती चांगली राहिल्यास वजन कमी करण्यास मदत होते. यासाठी तुम्ही तुळशीचा चहा प्यावा. सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. शरीरात चांगले बॅक्टेरिया विकसित होतात. आतड्याची हालचाल चांगली होते, ज्यामुळे वजन कमी होण्याच्या प्रक्रियेस वेग येतो.
तुळशीचा चहा पिण्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर येते. हे वजन कमी करण्यास देखील मदत करते. लिव्हर पचन प्रक्रियेस मदत करते आणि शरीरास आतून स्वच्छ करतो. तसेच शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकते आणि शरीरातील चरबी कमी करतो. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी दररोज तुळशीची पाने किंवा त्यापासून बनवलेला चहा घ्यावा.