अनेक गंभीर आजारांचा उपाय आहे रामफळ, फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:46 PM2024-01-24T12:46:32+5:302024-01-24T12:48:02+5:30

ही फळं आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात आणि अनेक आजारांपासून बचाव करतात.

Benefits of Ramphal, Sitaphal, Lakshmanphal and Hanumanphal for health | अनेक गंभीर आजारांचा उपाय आहे रामफळ, फायदे वाचून व्हाल अवाक्...

अनेक गंभीर आजारांचा उपाय आहे रामफळ, फायदे वाचून व्हाल अवाक्...

Ramphal Benefits: रामफळ एक असं फळ आहे ज्यात अनेक आजार दूर करण्याची शक्ती आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, सीता, लक्ष्मण आणि हनुमान नावाचीही फळं आहेत. या सगळ्यांचे आरोग्याला अनेक फायदे होतात.

भगवान रामाच्या नावावर फळ

भगवान रामाचा प्रभाव सगळीकडे आहे. रामफळ आणि रामबूटन अशी फळं आहेत ज्यांच्या नावातच राम आहे. ही फळं आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात आणि अनेक आजारांपासून बचाव करतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, सीताफळ, हनुमान फळ आणि लक्ष्मण नावाचेही फळं आहेत. चला जाणून घेऊ त्यांचे आरोग्याला होणारे फायदे....

रामफळाचे फायदे

रामफळामध्ये अनेक पोषक तत्व आणि हेल्दी प्रॉपर्टीज असतात. हे फळ डायबिटीसमध्ये ब्लड शुगर मेंटेन करण्याचं काम करतं. यात व्हिटॅमिन सी असतं जे तुमच्या त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतं.

कॅन्सरमध्ये रामफळ फायदेशीर

सायन्स डायरेक्टवर असलेल्या शोधानुसार, रामफळाच्या पानांमध्ये असे तत्व असतात जे कॅन्सरच्या उपचारात संभावित मदत करू शकतात. हे खाल्ल्याने इम्यूनिटी बूस्ट होते.

रामबूटनमधील पोषण

रामबूटनमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि न्यूट्रिएंट्स भरपूर असतात. यातून तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळतं जे सेल्स डॅमेजला कमी करतं. यात कॉपर, मॅगनीज, फॉस्फोरस, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, आयर्न आणि झिंकही असतं.

रामबूटनचे फायदे

जास्तीत जास्त आजार पोटापासून सुरू होतात आणि पचनाच्या समस्येमुळे होतात. या फळात सॉल्यूबल फायबर असतं, जे पचन चांगलं करतं. वजन कमी करणारे लोकही याचं सेवन करू शकतात आणि याने इन्फेक्शन दूर करण्यासही मदत मिळते.

सीताफळ खाण्याचे फायदे

सीताफळ खाण्यास फार गोड लागतं. हे फळ खाल्ल्याने मूड चांगला होतो. याने तुमच्या डोळ्यांच्या समस्याही दूर होतात आणि हाय ब्लड प्रेशरही कमी होतं. सीताफळामध्ये अ‍ॅंटी कॅन्सर गुण असतात.

लक्ष्मण फळ आणि हनुमान फळ

सोपसोप फ्रूटला लक्ष्मण फळ किंवा हनुमान फळही म्हटलं जातं. रामफळ आणि सीताफळसारखेच यात अ‍ॅंटी कॅन्सर गुण असतात. जर तुम्हाला बॅक्टेरिअल इन्फेक्शन असेल तर याचं सेवन करावं.

Web Title: Benefits of Ramphal, Sitaphal, Lakshmanphal and Hanumanphal for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.