Epsom salt Bath : दिवसात किमान एक वेळ आंघोळ करण्याची सवय सगळ्यांनाच असते. आंघोळ करणं हा रोजच्या रूटीनमधील महत्वाचं काम असतं. कारण आंघोळ केल्यानं रात्रीची आळस तर निघून जातोच, सोबतच शरीरावरील मळ-माती, बॅक्टेरियाही निघून जातात. ज्यामुळे फ्रेश वाटतं. सामान्यपणे सगळेच लोक साध्या पाण्यानं आंघोळ करतात. मात्र, काही एक्सपर्ट पाण्यात मीठ टाकूनही आंघोळ करण्याचा सल्ला देतात. असं केल्यास शरीर आणखी स्वच्छ तर होतंच, सोबतच अनेक समस्याही दूर होतात. आंघोळीच्या पाण्यात टाकण्यासाठी खासकरून एप्सम सॉल्टचा वापर केला जातो. एप्सम सॉल्टला मॅग्नेशिअम सल्फेट नावानंही ओळखलं जातं. चला जाणून घेऊ याचे फायदे...
स्नायूंचा थकवा होईल कमी
साध्या मिठापेक्षा एप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशिअमचं प्रमाण भरपूर असतं. ज्याच्या मदतीनं स्नायूंचा थकवा आणि वेदना दूर करण्यास मदत मिळते. जेव्हा तुम्ही एप्सम सॉल्टनं आंघोळ करताना तेव्हा मॅग्नेशिअम त्वचेत अब्जॉर्ब होतं आणि स्नायूंमध्ये जमा लॅक्टिक अॅसिड आणि विषारी तत्व बाहेर निघतात. ज्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी होतात.
मानसिक थकवा जातो
मॅग्नेशिअम जास्त असलेलं एप्सम सॉल्ट शरीरासोबतच मानसिक आरोग्यही चांगलं ठेवतं. मॅग्नेशिअम तणाव वाढणवारे हार्मोन्स कमी करतं. ज्यामुळे मेंदू शांत राहतो. गरम पाण्यात एप्सम सॉल्ट टाकून आंघोळ केल्यास मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते. सोबतच झोपेची क्वालिटी सुद्धा सुधारते.
त्वचेसाठी चांगलं
आंघोळीच्या पाण्यात हे मीठ टाकून आंघोळ केल्यास यातील अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणांमुळे त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होऊ शकतात. यानं त्वचा क्लीन होते आणि डेड सेल्सही निघून जातात. ज्यामुळे त्वचा उजळते आणि चमकदार दिसते. त्वचेवरील पुरळ, सूज किंवा खाजही दूर होते.
शरीरातील विषारी तत्व निघतात
वेगवेगळ्या कारणांमुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ बसतात. ते बाहेर काढण्यासाठी एप्सम सॉल्ट फायदेशीर ठरतं. तसेच शरीरात जमा असलेले अतिरिक्त तरल पदार्थही बाहेर निघतात. हे मीठ शरीराला नॅचरल पद्धतीनं डिटॉक्स करण्याचं काम करतं.
सूज आणि वेदना होईल दूर
एप्सम सॉल्ट आंघोळीच्या पाण्यात टाकलं तर शरीरावर असलेली सूज आणि स्नायूंमधील वेदना दूर होतात. जर तुम्हाला संधिवात किंवा इतर कोणती सूज असेल तर हे मीठ आंघोळीच्या पाण्यात टाकणं खूप फायदेशीर ठरेल.