सावधान! पावसाळ्यात मशरुम खाण्याचा विचारही करू नका, तुमचे आरोग्य येईल धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 05:43 PM2021-07-23T17:43:23+5:302021-07-23T17:57:40+5:30

मशरूम खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र, पावसाळ्यात मशरूमवर जीवाणू वाढतात. त्यामुळे विशेष करून या हंगामात आपण मशरूम खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे.

Be careful! Don't make the mistake of eating mushrooms in the rain, the consequences are extremely dangerous ... | सावधान! पावसाळ्यात मशरुम खाण्याचा विचारही करू नका, तुमचे आरोग्य येईल धोक्यात

सावधान! पावसाळ्यात मशरुम खाण्याचा विचारही करू नका, तुमचे आरोग्य येईल धोक्यात

googlenewsNext

पावसाळा सुरु झाला म्हणजे आजारांची जंत्री सुरु होते. त्यामुळे पावसाळ्यात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे बनून जाते. पावसाळ्यात पोटदुखी आणि विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच डॉक्टर पावसाळ्यात उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे पुर्णपणे टाळण्यास सांगतात. कारण बॅक्टेरियाने संक्रमित अन्न खाल्ल्यास विषबाधा, सूज येणे, अतिसार, उलट्या इत्यादी आजार बळावण्याची शक्यता वाढते.


मशरूम खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र, पावसाळ्यात मशरूमवर जीवाणू वाढतात. त्यामुळे विशेष करून या हंगामात आपण मशरूम खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे. या काळात हवेतील जास्त आर्द्रतेमुळे कीटक आणि जीवाणू मशरूमवर लवकर वाढतात. ते आपल्या डोळ्यांना पटकन दिसत नाहीत. मात्र, यामुळे पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच मशरुम खल्ल्याने ज्यामुळे आपल्याला आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून, पावसाळ्यात मशरूम खाणे टाळा. 

मानवी शरीरासाठी व्हिटॅमिन डी ची खूप आवश्यकता असते. याची कमतरता जाणवू लागल्यास वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे कारण यामुळे आपल्याला, अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. असं असलं तरी व्हिटॅमिन डी खूप कमी भाज्यांमध्ये सापडते. यापैकी मशरूम एक आहे. मशरूममध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. यामुळे शरीराची व्हिटॅमिन डी ची गरज पूर्ण होते.
पांढऱ्या आणि पोर्टेबेला प्रकारच्या मशरूममध्ये याचं प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे आहार तज्ज्ञ देखील मशरूमला दैनंदिन आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. मात्र, पावसाळ्यात मशरूम खाणे टाळले पाहिजे, असा सल्ला देखील तज्ज्ञमंळी देतात. मशरूम अगदी सहजपणे बाजारात उपलब्ध होतात. त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची पद्धत देखील अगदी साधीसोपी आहे. खूप कमी वेळेत मशरूमचे सलाड, भाजी किंवा सूप तयार करता येते.


 

Web Title: Be careful! Don't make the mistake of eating mushrooms in the rain, the consequences are extremely dangerous ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.