रोजच्या खाण्यातील पदार्थांमुळे दातांचं होतंय मोठं नुकसान; पांढऱ्या, मजबूत दातांसाठी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 04:33 PM2021-04-06T16:33:43+5:302021-04-06T16:43:21+5:30

दात पडला की, त्या जागी आर्टिफिशिअल दात लावण्याची ही ॲडव्हान्स पद्धत इतकी ॲडव्हान्स आहे की, हे दात लावले हे कळतही नाही. पण डेटंल इम्प्लांटस केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

Avoid these substances after dental implants, know the advice of experts | रोजच्या खाण्यातील पदार्थांमुळे दातांचं होतंय मोठं नुकसान; पांढऱ्या, मजबूत दातांसाठी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

रोजच्या खाण्यातील पदार्थांमुळे दातांचं होतंय मोठं नुकसान; पांढऱ्या, मजबूत दातांसाठी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Next

हसतोस काय दात दिसतायत? असं नेहमी म्हणतात. म्हणूनच दातांची काळजी घेणे सौंदर्यासाठी फार महत्वाचे आहे. हल्ली दातांच्या इतक्या नव्या आणि चांगल्या ट्रिटमेंट आल्या आहेत की, तुमचे मूळ दात कसेही असो, तुम्हाला हवे तसे दात हल्ली करुन मिळतात. तुम्ही जन्मताना तुमचे दात कसे होते हे तुम्हाला नवे दात केल्यानंतर अजिबात आठवणार नाही. दातांसाठी केली जाणारी डेंटल इम्प्लांट्स ही ट्रिटमेंट केली जाते. 

दात पडला की, त्या जागी आर्टिफिशिअल दात लावण्याची ही ॲडव्हान्स पद्धत इतकी ॲडव्हान्स आहे की, हे दात लावले हे कळतही नाही. पण डेटंल इम्प्लांटस केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. इम्प्लांटस केल्यानंतर तुम्ही नेमकी कशी काळजी घ्यायला हवी याविषयी मुंबई सेंट्रल येथील व्हॉकहार्ट रुग्णालायाचे दंत चिकित्सा आणि मॅक्सिलोफेशियल सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. चिराग देसाई देत आहेत अत्यंत महत्वाची माहिती

डेंटल इम्प्लांटस म्हणजे काय

तरुणपणात दात पडल्यानंतर त्या जागी दुसरा दात येण्याची शक्यता ही फारच कमी असते. एखादा मोक्याचा दात पडला की, हसल्यानंतर तोंड फारच विचित्र दिसतं. असा पडलेला दात पुन्हा येणार नाही हे माहीत आहे. कवळी हा त्यावरचा फार पूर्वी असलेला असा उपाय आहे. जो केवळ ठेवता येतो.त्यानंतर फिक्स कवळी असादेखील प्रकार आला. पण आता त्याहून अधिक अॅडव्हान्स होत डेंटल इम्प्लांटस आले आहेत.यामध्ये तुमचा जो दात पडला आहे त्या ठिकाणी स्क्रू फिट करुन दात लावला जातो. जो तुमच्या इतर दातांसारखाच दिसतो.

अशी घ्या दातांची काळजी

डेंटल इम्प्लांटस केल्यानंतर दातांची काळजी घेणे फार गरजेचे असते. ही प्रोसिजर झाल्यानंतर काही काळ आणि त्यानंतर आयुष्यभरासाठी दातांची काळजी घेण्यासाठी आहारातून काही गोष्टी वगळाव्या लागतात. त्या कोणत्या ते जाणून घेऊया.
 
डेटंल इम्प्लांट सर्जरी झाल्याच्या काही तासांमध्ये गरम खाद्यपदार्थ खाता येत नाहीत. पाणी ही पिणे काही काळासाठी व्यर्ज असते. कारण पाणी पिताना बरेचदा आपण घटाघटा पितो. त्यावेळी ते आत ओढतो. दात नुकताच लावला असेल तर त्याची ग्रीप सैल होण्याची शक्यता असते.

इम्प्लांट करुन झाले असतील आणि आता तुम्ही तुमची रोजची जीवनशैली जगतानाही काही काळजी घेणे गरजेचे असते. दारुचे सेवन हे त्यानंतर करता येत नाही. त्यामध्ये असलेले घटक दात सैल करु शकतात.

काजू, बदाम, पिस्ता, शेंगदाणे हे खाण्यासाठी जरी चटपटीत वाटत असले तरी देखील हे पदार्थ तुमच्या दातांमध्ये अडकू शकता. त्यामुळेही दातांना दुखापत होऊ शकते.

समोर आला कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन'; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक; धोक्याचा इशारा देत तज्ज्ञ म्हणाले....
 
चहा-कॉफीची तुम्हाला सवय असेल तर ही सवय तुम्हाला आताच सोडावी लागेल. कारण चहा-कॉफी तुमच्या नैसर्गिक दातांसोबत तुमच्या नव्या दातांवर डाग देऊ शकते.
 
बटाट्याचे चिप्स, कॉर्न चिप्स असे स्टार्चयुक्त पदार्थ खाणे टाळा. कारण असे पदार्थ दातांमध्ये जाऊन चिकटता. ते काढताना बसवलेला दात निघण्याची किंवा सैल होण्याची शक्यता असते.

साध्या वाटणाऱ्या 'या' ७ लक्षणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो हृदयाचा गंभीर आजार; वेळीच सावध व्हा
 
कडक कँडी, चॉकलेट असे पदार्थही तुम्ही टाळायला हवे. कारण असे पदार्थ तुमच्या दातांना दुखावू शकतात.
 
पिझ्झा,बर्गर अशा ओढून आणि तोंड ताणून खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपासूनही दूर राहा कारण असे पदार्थ तुमच्या दातांमध्ये चिकटतात. 
 
हे ही असू द्या लक्षात
 
एकदा इम्प्लांट केले म्हणजे झाले असे होत नाही. काही पदार्थ टाळण्यासोबतच तुम्ही दररोज दातांची योग्य पद्धतीनं साफसफाई करायला हवी. दर 6 महिन्यांनी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यायला हवा. जर दात हलत असेल किंवा तुम्हाला इतर दिवसापेक्षा वेगळे वाटत असेल तर तातडीने डॉक्टरांकडे जाणे कधीही चांगले. आता दातांसंदर्भातील या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही दातांची काळजी घ्या आणि सुंदर दिसा. 
 

Web Title: Avoid these substances after dental implants, know the advice of experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.