ABHA For Arogya Setu Users: आरोग्य सेतूच्या युजरना मिळणार आयुष्मान भारतची ही सुविधा; केंद्र सरकारची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 08:25 PM2022-02-11T20:25:57+5:302022-02-11T20:26:20+5:30

ABHA For Arogya Setu Users: आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंटशी जे कोणी रजिस्टर करतील त्यांना अॅपवरूनच १४ अंकी युनिक नंबर देण्यात येणार आहे.

arogya Setu users can create the 14-digit unique Ayushman Bharat Health Account (ABHA) number to store medical records | ABHA For Arogya Setu Users: आरोग्य सेतूच्या युजरना मिळणार आयुष्मान भारतची ही सुविधा; केंद्र सरकारची घोषणा

ABHA For Arogya Setu Users: आरोग्य सेतूच्या युजरना मिळणार आयुष्मान भारतची ही सुविधा; केंद्र सरकारची घोषणा

googlenewsNext

आरोग्य सेतू अॅपचा वापर करणाऱ्यांना सरकारने मोठी सुविधा देऊ केली आहे. या युजरना त्यांची वैद्यकीय माहिती एकाच जागी ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी या लोकांना आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) देण्यात येणार आहे. 

आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंटशी जे कोणी रजिस्टर करतील त्यांना अॅपवरूनच १४ अंकी युनिक नंबर देण्यात येणार आहे. याद्वारे आरोग्य सेतूचे युजर त्यांची नवी, जुनी वैद्यकीय माहिती आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंटला जोडू शकणार आहेत. केंद्र सरकारने नुकतेच नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनचे नाव बदलून आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) केले आहे. 

सर्व नागरिकांना डिजिटल हेल्थ आयडी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. या डिजिटल आयडीमध्ये आरोग्यविषयक नोंदींची संपूर्ण माहिती दिली जाईल. सरकारने 15 ऑगस्ट 2020 रोजी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान योजना सुरू केली होती. आतापर्यंत ही योजना प्रायोगिक तत्त्वावर चालवली जात होती. या योजनेअंतर्गत एक लाखाहून अधिक हेल्थ आयडी बनवण्यात आले आहेत.



 

आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत, नागरिकांना मिळणारे हेल्थ आयडी कार्ड, ज्याद्वारे व्यक्तींना ओळखता येईल आणि त्याचे प्रमाणीकरण केले जाईल. तसेच त्यांचे आरोग्य अहवाल अनेक यंत्रणा आणि भागधारकांना वितरित केले जातील. हा आयडी तयार करण्यासाठी नागरिकांची महत्वाची माहिती गोळा केली जाईल. या अभियानांतर्गत सर्व नागरिकांच्या आरोग्यविषयक नोंदींचा डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. नागरिकांना हवे तेव्हा या माहितीचा वापर करता येईल. 

Web Title: arogya Setu users can create the 14-digit unique Ayushman Bharat Health Account (ABHA) number to store medical records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.