शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

डॉक्टरांचा सल्ला न घेता अँटीबायोटिक्स घेणं अत्यंत धोक्याच, रिसर्चनुसाप गंभीर परिणाम नक्की!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 15:57 IST

कित्येक वेळा रुग्ण स्वतःच डॉक्टरांचा सल्ला न घेता अँटीबायोटिक औषधं (Antibiotics) घेतात; मात्र असं करणं धोक्याचं ठरत असल्याचं लॅन्सेटने केलेल्या एका अभ्यासात समोर आलं आहे.

सर्दी-ताप किंवा खोकला अशा आजारांसाठी डॉक्टर्स अनेकदा अँटीबायोटिक औषधं लिहून देतात. कित्येक वेळा रुग्ण स्वतःच डॉक्टरांचा सल्ला न घेता अँटीबायोटिक औषधं (Antibiotics) घेतात; मात्र असं करणं धोक्याचं ठरत असल्याचं लॅन्सेटने केलेल्या एका अभ्यासात समोर आलं आहे. गरज नसताना वारंवार अँटीबायोटिक औषधं (Side effect of antibiotics) घेतल्यामुळे त्यांचा परिणाम कमी होऊन जातो. नंतर एखाद्या गंभीर आजारावेळी जेव्हा खरोखरच अँटीबायोटिक्सची गरज असते, तेव्हा ते औषध परिणाम करत नाही आणि रुग्ण दगावण्याची शक्यता असते. भारतात सध्या हेच होत असल्याचं लॅन्सेटच्या अभ्यासात (Lancet Study) समोर आलं आहे.

कित्येक औषधांना परवानगीच नाहीभारतात अँटीबायोटिक्सच्या वापरावर कसलंही नियंत्रण नसल्याची बाब या संशोधनामध्ये समोर आली आहे. देशात सध्या वापरात असलेल्या 44 टक्के अँटीबायोटिक औषधांना सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल (CDSCO) ऑर्गनायझेशनची परवानगीच मिळाली नसल्याची (Non-Approved antibiotics in India) धक्कादायक बाब लॅन्सेटने समोर आणली आहे. केवळ 46 टक्के औषधांनाच CDSCOची परवानगी आहे.

कोविड काळात वाढलं प्रमाणया अहवालात अ‍ॅझिथ्रोमायसीन औषधाच्या गैरवापराचा खास उल्लेख करण्यात आला आहे. कित्येक राज्यांनी कोरोना काळात कोविडवरच्या उपचारांच्या प्रोटोकॉलमध्ये या अँटीबायोटिक औषधाचा उल्लेख केला होता. तसंच, कित्येकांनी स्वतःला कोरोनाची लागण झाल्यानंतर अ‍ॅझिथ्रोमायसीन औषध घेण्यास सुरुवात केली होती; मात्र एम्सचे (AIIMS) पब्लिक हेल्थ एक्स्पर्ट डॉ. संजय राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना किंवा अन्य कोणत्याही व्हायरल आजारामध्ये अँटीबायोटिक्स (Taking Antibiotics during viral infections) घेणं चुकीचं आहे. यामुळे शरीराला या औषधांची सवय होऊन जाते आणि नंतर नंतर त्यांचा परिणाम होणं बंद होतं. अँटीबायोटिक्सचा वापर खरं तर न्यूमोनिया, जखमेचे इन्फेक्शन अशा गंभीर प्रकारांमध्ये होणाऱ्या बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून रुग्णांना वाचवण्यासाठी केला जातो; मात्र आधीपासूनच शरीराला त्याची सवय झाल्यामुळे आयसीयूमधल्या रुग्णांना वाचवणंही शक्य होत नसल्याचं राय यांनी सांगितलं.

झी न्युज हिंदीने दिलेल्या बातमीत म्हटल्याप्रमाणे बीएल कपूर रुग्णालयातले डॉक्टर राजेश पांडे यांनी सांगितलं, की भारतात सध्या थेट अ‍ॅडव्हान्स अँटीबायोटिक औषधं वापरली जातात. गेल्या कित्येक वर्षांपासून नवीन अँटीबायोटिक औषधच तयार झालं नसल्यामुळे रुग्णांसाठी आता ही औषधं परिणामकारक ठरत नाहीयेत.

अँटीबायोटिक्स ठरताहेत कुचकामी2019 साली चंडीगडमधल्या पीजीआय संस्थेने केलेल्या एका रिसर्चमध्ये असं दिसून आलं होतं, की भारतीयांवर अँटीबायोटिक औषधांचा परिणामच (Antibiotics not working) होत नाही. या अभ्यासात सहभागी झालेल्या 207 रुग्णांपैकी 139 रुग्णांवर एक किंवा एकाहून अधिक अँटीबायोटिक औषधं परिणामकारक ठरली नव्हती. तसंच, या रिसर्चमधल्या दोन टक्के रुग्णांवर एकाही अँटीबायोटिक औषधाचा परिणाम झाला नाही.

काय आहे कारण?हे होण्यामागे काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अँटीबायोटिक्स कशी काम करतात (How antibiotics work) याची माहिती घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्या शरीरातले बॅक्टेरिया आणि अँटीबायोटिक औषधं यांच्यामध्ये लढाई होते, तेव्हा बॅक्टेरिया टिकून राहण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करतात. आपल्या मूळ स्वरूपात बदल करण्यासाठी बॅक्टेरिया नवीन प्रकारचं प्रोटीन तयार करू लागतात. तसंच, ते आपल्या पेशींच्या भिंतीला झालेलं नुकसान भरून काढण्यासही सक्षम असतात. असं केल्याने औषध त्यांमध्ये प्रवेश करू शकत नाही आणि बॅक्टेरिया शरीरातच तग धरून राहू शकतो. एखादं औषध वारंवार घेतल्यास बॅक्टेरियालाही कळून जातं, की त्यामुळे काय परिणाम होणार आहे. अशा वेळी ते नवीन प्रकारचं प्रोटीन तयार करून स्वतःचा बचाव करतात. यामुळेच वारंवार एकाच प्रकारचं औषध घेणं टाळण्याचा सल्ला दिला जातो.

भारतात आरोग्य व्यवस्थेवर खर्च कमीलॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थच्या एका अहवालात असं दिसून आलं होतं, की भारतात आरोग्य व्यवस्थेवर अगदी कमी खर्च केला जातो. देशातल्या लहान शहरांमध्ये असलेल्या आरोग्य केंद्रांवर डॉक्टर उपलब्ध नसणं, जे उपलब्ध आहेत त्यांच्यामध्येच अँटीबायोटिक औषधांबद्दल जागरूकता नसणं ही देशातल्या अँटीबायोटिक्सच्या गैरवापराची मोठी कारणं असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

इतर देशांमधली परिस्थितीकित्येक विकसित देशांमध्ये जेव्हा डॉक्टर अँटीबायोटिक औषधं लिहून देतात, तेव्हा त्याचं कारणही द्यावं लागतं. अमेरिकेत अशाच प्रकारचा नियम आहे. त्यामुळे तिथले डॉक्टर्स अँटीबायोटिक औषधं घेण्याचा सल्ला देण्यापूर्वी भरपूर विचार करतात. अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये तर शेतीमध्येही अँटीबायोटिक्स वापरण्यास बंदी (Antibiotics in Farming banned) लागू करण्यात आली आहे. कारण, शेती आणि पोल्ट्री अशा ठिकाणी अँटीबायोटिक्स वापरल्यामुळे ते माणसांच्या शरीरात आपोआपच जात असल्याचं दिसून आलं आहे. प्राण्यांचं वजन, किंवा दूध वाढवण्यासाठी, तसंच पिकांचं उत्पादन चांगलं येण्यासाठी अँटीबायोटिक्सचा सर्रास वापर केला जातो. कोंबडी, बकरी यांच्या मांसामधून, तसंच गायी-म्हशीच्या दुधामधूनही अँटीबायोटिक्स गरज नसताना माणसांच्या पोटात जात आहेत. एका अंदाजानुसार, अँटीबायोटिक औषधांचा वापर 70 टक्के शेतीमध्ये आणि 30 टक्के माणसांमध्ये केला जातो आहे. हे अगदी घातक आहे.

भारतात काय करायला हवं?भारतात अँटीबायोटिक औषधांबाबत नियम (Rules regarding antibiotics in India) लागू आहेत. मेडिकल दुकानदारांना या औषधांची नोंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच प्रिस्क्रिप्शनशिवाय अशी औषधं देण्यास प्रतिबंध आहे; मात्र केमिस्ट असोसिएशनचे कैलाश गुप्ता यांनी सांगितल्याप्रमाणे, नियम असणं आणि ते लागू होणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. भारत सरकारच्या नवीन अँटीबायोटिक पॉलिसीमध्ये लहान नर्सिंग होम किंवा क्लिनिकमध्ये अ‍ॅडव्हान्स स्तरावरच्या अँटीबायोटिक्सचा वापर न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच, डॉक्टरांनाही प्रत्येक आजारावर अँटीबायोटिक न देण्याबाबत ट्रेनिंग देण्याची तयारी सुरू आहे; मात्र या सर्व गोष्टींची अंमलबजावणीच होताना दिसून येत नाही.

भारतातील अँटीबायोटिक्सचे दुष्परिणाम टाळण्यासाठी डॉक्टरांनी विनाकारण अँटीबायोटिक्स देणं आणि सरकारने नियमांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे. तसंच, इतर देशांप्रमाणे आपल्याकडेही शेतीमध्ये किंवा पोल्ट्रीमध्ये अँटीबायोटिक्सचा वापर बंद करण्याबाबत नियम लागू करणं आवश्यक आहे.

सामान्य माणसं काय करू शकतात?भारतातले कित्येक नागरिक आजारी पडल्यानंतर स्वतःच डॉक्टर होतात आणि स्वतःच्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे ओळखीच्या मेडिकलमधून औषधं घेऊन खातात. डॉक्टर्सऐवजी मेडिकल दुकानदाराला विचारून औषधं घेण्यात तर भारतीय सर्वांत पुढे असतील. त्यामुळेच, अँटीबायोटिक्स औषधांपासून होणारं नुकसान टाळण्यासाठी सर्वांत आधी नागरिकांनी ही सवय सोडणं गरजेचं आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स