शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अँटी-इंफ्लेमेटरी पदार्थ आहारात घेतल्याने गुडघेदुखीवर मिळेल आराम, जाणून घ्या कोणते पदार्थ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 16:48 IST

गुडघेदुखी संपवण्यासाठी दाहक-विरोधी (अँटी-इंफ्लेमेटरी) पदार्थ महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. दैनंदिन आहारात दाहक-विरोधी पदार्थांचा समावेश केल्यास एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

गुडघेदुखी ही आता सामान्य समस्या बनली आहे. गुडघेदुखीचे मुख्य कारण म्हणजे सांधेदुखी, त्यामुळे सांध्यांना सूज येते. गुडघेदुखीमुळे चालणे, उठणे, बसणे कठीण होते. ही समस्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये आढळते.

हिवाळ्यात सांधेदुखीची ही समस्या खूप सतावते. सामान्यतः लोक वेदना कमी करण्यासाठी पेन किलरची मदत घेतात, त्यामुळे लगेच आराम मिळतो पण समस्या मुळापासून संपत नाही. गुडघेदुखी संपवण्यासाठी दाहक-विरोधी (अँटी-इंफ्लेमेटरी) पदार्थ महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. दैनंदिन आहारात दाहक-विरोधी पदार्थांचा समावेश केल्यास एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

भरपूर बेरी खा -हेल्थलाइनच्या माहितीनुसार, बेरी हे एक असे लहान फळ आहे, ज्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. बेरीमध्ये अँथोसायनिन्स नावाचे अँटिऑक्सिडेंट असतात, ज्यात दाहक-विरोधी प्रभाव असतो. बेरी खाल्ल्याने सांधेदुखी आणि सूजही कमी होते.

ब्रोकोली-ब्रोकोलीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. ब्रोकोलीतील सल्फोराफेन हे अँटिऑक्सिडंट आहे, जे सायटोकिन्स आणि कप्पा बी न्यूक्लियर फॅक्टर कमी करून दाह कमी करते.

अ‌ॅवाकॅडो फायदेशीर -अ‌ॅवाकॅडोमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि हृदयासाठी निरोगी मोनोसॅच्युरेटेड फॅट असतात. अ‌ॅवाकॅडोमध्ये एक कंपाऊंड असते, जे नव्याने तयार झालेल्या त्वचेच्या पेशींमध्ये जळजळ कमी करू शकते.

मशरूम -जगभरात मशरूमच्या हजारो प्रजाती आढळतात, परंतु त्यापैकी फक्त काही खाण्यायोग्य आहेत. मशरूममध्ये कॅलरीज कमी असतात, तर सेलेनियम, कॉपर आणि व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असतात. मशरूममध्ये फिनॉल आणि इतर अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे दाहक-विरोधी संरक्षण देतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स