शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Health tips: शरीरातील रक्ताची कमतरता नाही सामान्य! वेळीच उपाय केले नाहीत तर होऊ शकतो 'हा' आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 10:25 IST

शरीरात रक्ताची कमतरता असताना थकवा ते बेशुद्ध पडण्यापर्यंत विविध लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे योग्य वेळी ओळखली गेली तर ही समस्या गंभीर नसून त्यावर उपाय (Healthy Foods) करता येतात.

शरीरात रक्ताची कमतरता होणं ही एक सर्वसामान्य समस्या आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS) च्या अहवालानुसार, भारतातील ५८.६ टक्के मुले, ५३.२ टक्के मुली आणि ५०.४ टक्के गर्भवती महिलांना अ‍ॅनिमियाचा (रक्त कमी असणं) त्रास होतो. अशक्तपणा ही अशी स्थिती आहे जेव्हा शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या एका ठराविक पातळीपर्यंत कमी होते. हेल्थलाइनच्या माहितीनुसार, शरीरात रक्ताची कमतरता असताना थकवा ते बेशुद्ध पडण्यापर्यंत विविध लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे योग्य वेळी ओळखली गेली तर ही समस्या गंभीर नसून त्यावर उपाय (Healthy Foods) करता येतात.

ही अशक्तपणाची लक्षणे आहेत -

  • जेव्हा शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते, तेव्हा आपल्याला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
  • शरीरात रक्त कमी असतं तेव्हा ऑक्सिजनची कमतरता देखील जाणवते. यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
  • रक्ताच्या कमतरतेमुळे संधिवात, कर्करोग, किडनीशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत आपली अ‍ॅनिमियासाठी चाचणी घेणे महत्त्वाचे आहे.
  • डोकेदुखी आणि हात-पाय थंड पडणे हे देखील शरीरात रक्ताची कमतरता असल्याचे लक्षण आहे.
  • त्वचा पिवळी पडणे, चेहरा किंवा पाय सुजणे हे देखील रक्ताच्या कमतरतेमुळे होते.

अशक्तपणा असल्यास काय खावे?पालकमध्ये लोह असते. याच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. कोणाला अॅनिमियाचा त्रास होत असेल तर आपण आहारात टोमॅटो अवश्य खावे. रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी टोमॅटो ही अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. तीळ, भोपळ्याच्या बिया, टरबूज, सूर्यफुलाच्या बिया, काजू आणि जवस शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतात. अंडी, दूध, चीज, मांस, मासे, सोयाबीन, तांदूळ, हिरव्या पालेभाज्या शरीरातील रक्ताची कमतरता कमी करतात. याबाबत आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स