पपईप्रमाणेच पपईच्या बियाही आरोग्यासाठी असतात गुणकारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 11:19 AM2018-07-17T11:19:01+5:302018-07-17T11:20:37+5:30

पपईमधील पोषक तत्वे आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मुख्यतः पपईचा उपयोग डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी करण्यात येतो. परंतु याव्यतिरिक्त पपईचे शरिराला अनेक फायदे आहेत.

amazing health benefits of papaya seeds | पपईप्रमाणेच पपईच्या बियाही आरोग्यासाठी असतात गुणकारी!

पपईप्रमाणेच पपईच्या बियाही आरोग्यासाठी असतात गुणकारी!

googlenewsNext

पपईमधील पोषक तत्वे आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मुख्यतः पपईचा उपयोग डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी करण्यात येतो. परंतु याव्यतिरिक्त पपईचे शरिराला अनेक फायदे आहेत. आयर्न, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारखी विभिन्न पोषक तत्व असलेल्या पपईचा त्वचेला जसा फायदा होता. तसाच शरिराला गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी देखील पपईचा उपयोग होतो. पपईसारख्याच तिच्या बियाही शरिरासाठी उपयुक्त असतात. यांचा उपयोग त्वचेची अॅलर्जी, कॅन्सर आणि लहान मुलांचे पोटाचे विकार अथवा जंत यांसारखे विकार दूर करण्यासाठी करण्यात येतो. पपईच्या बियांमध्ये अॅन्टीबॅक्टेरिअल गुण मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे शरिराचा इन्फेक्शन आणि अॅलर्जीपासून बचाव होतो. तसेच या शरिरातील विषारी घटक शरिराबाहेर टाकण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊयात पपईच्या बियांचे शरिराला होणारे फायदे...

1. लिव्हरचे आरोग्य राखण्यास गुणकारी

पपईच्या बिया लिव्हरचे आरोग्य चांगले राखण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतात. या लिव्हर सोरोसिससारख्या विकारांवर उपयुक्त ठरतात. तुम्ही लिंबाच्या रसासोबत या घेऊ शकता. सकाळी उठल्यानंतर अनोशापोटी पपईच्या बियांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

2. वायरल तापावर उपयुक्त

तुम्ही रोज पपईच्या बियांचे सेवन केले तर व्हायरल तापाची लागण होण्याचा धोका कमी होतो. या बीया अॅन्टी-वायरल एजंटचे काम करतात. त्याचसोबत या इतर संसर्गजन्य आजारांवरही उपयुक्त ठरतात. 

3. कॅन्सरपासून बचाव 

कॅन्सरसारख्या रोगापासून बचाव करण्यासाठी पपईच्या बिया फायदेशीर ठरतात. या बियांमध्ये आयसोथायोसायनेट नावाचे तत्व असते. जे कॅन्सरवर उपचार म्हणून आणि कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरते.

4. शरिरातील टॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी फायदेशीर

पपईच्या बियांचे सेवन करण्यामुळे फक्त शरिरातील फॅट्स आणि शरिरातील विषारी घटक बाहेर फेकले जात नाही तर या बिया शरिरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्याचेही काम करतात. 

5. आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी मदत 

पपईच्या बियांचे सेवन करणे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. याव्यतिरिक्त पपईच्या बियांमध्ये अॅन्टी बॅक्टेरियल गुण आणि अॅन्टी इफ्लेमेंटरी गुण असतात. हे गुण पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. पचनशक्ती सुधारण्यासाठी पपईच्या बिया रामबाण उपाय ठरतात. यांच्या सेवनाने पचनसंस्थेसंबंधातील तक्रारी दूर होतात. 

6. किडनीच्या तक्रारी दूर करण्यासाठी

पपईच्या बियांच्या सेवनाने किडनीसंबंधीच्या सर्व तक्रारी दूर होण्यास मदत होते. याच्या बिया किडनीचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. किडनी स्टोन आणि किडनीचे कार्य नीट चालण्यासाठी पपईच्या बियांचे सेवन गुणकारी मानले जाते. 

7. मासिक पाळीतील पोटदुखीवर इलाज

काही महिलांना मासिक पाळीदरम्यान प्रचंड वेदना होतात. त्यावर उपचार म्हणूनही पपईच्या बियांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यामुळे मासिक पाळीचे चक्रही नियमित होण्यास मदत होते आणि वेदनाही दूर होतात. 

8. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी

पपईच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी तसेच वाढत्या वयाच्या काही समस्यांवर उपाय म्हणून काम करते.

या गोष्टी लक्षात ठेवा.

प्रत्येकाची शारिरीक रचना सारखी नसते, त्यामुळे अनेकदा काही गोष्टींचा त्रास होण्याचीही शक्यता असते. त्यामुले तुम्ही पपईच्या बियांचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता. 

Web Title: amazing health benefits of papaya seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.