काळे मिरे पावडर आणि तूप मिक्स करून खाल तर मिळतील अनेक फायदे, वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 11:12 AM2024-05-24T11:12:33+5:302024-05-24T11:13:07+5:30

Ghee And Black Pepper Benefits: हा एक फार जुना आयुर्वेदिक उपाय आहे. या मिश्रणाचे तुम्हाला कोणते फायदे मिळतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Amazing health benefits of eating black pepper powder with ghee | काळे मिरे पावडर आणि तूप मिक्स करून खाल तर मिळतील अनेक फायदे, वाचून व्हाल अवाक्...

काळे मिरे पावडर आणि तूप मिक्स करून खाल तर मिळतील अनेक फायदे, वाचून व्हाल अवाक्...

Ghee And Black Pepper Benefits: काळे मिरे भारतीय किचनमधील महत्वाच्या मसाल्यांपैकी एक आहे. वेगवेगळ्या फूड्समध्ये आणि भाज्यांमध्ये याचा वापर केला जातो. तूपाचेही आरोग्याला होणारे फायदे सगळ्यांना माहीत असतात. पण अनेकांना हे माहीत नसेल की, काळ्या मिऱ्यांचं पावडर आणि तूपाचं मिश्रण खाल्ल्याने आरोग्याला खूपसारे फायदे मिळतात. हा एक फार जुना आयुर्वेदिक उपाय आहे. या मिश्रणाचे तुम्हाला कोणते फायदे मिळतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काळे मिरे आणि तूपाचे फायदे

१) पचन तंत्र सुधारतं

काळ्या मिऱ्यांमध्ये पायपरिन नावाचं तत्व असतं. जे पचन एंझाइमचं उत्पादन वाढवतं. जेव्हा हे तूपासोबत खाल्लं जातं तेव्हा हे पचन आणखी चांगलं करतं. तूपामुळे पचन तंत्र सॉफ्ट होतं आणि बद्धकोष्ठतेसारखी समस्या दूर करण्यास मदत मिळते.

२) अॅंटी इन्फ्लेमेटरी तत्व

काळे मिरे आणि तूप दोन्ही गोष्टींमध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी तत्व भरपूर असतात. या मिश्रणाने शरीरात वेगवेगळ्या कारणांनी वाढलेली सूज कमी करण्यास मदत मिळते. 

३) इम्यून सिस्टीम मजबूत होतं

काळ्या मिऱ्यांमध्ये असलेले अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि तूपात आढळणारे व्हिटॅमिन्स व मिनरल्स मिळून शरीराची रोग प्रतिकारक क्षमताही वाढते. याने शरीराचा वेगवेगळ्या इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो,

४) त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

काळ्या मिऱ्यांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे त्वचा चमकदार करतात आणि त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. तूप त्वचेला मॉइश्चराइज होते आणि केसांना पोषण देतं. ज्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात.

५) मानसिक आरोग्य चांगलं राहतं

तूपामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतं जे मेंदुच्या आरोग्यासाठी गरजेचं असतं. काळ्या मिऱ्यांचं नियमित सेवन केल्याने मानसिक एकाग्रता वाढण्यास मदत मिळते.

कसं कराल सेवन?

काळे मिरे पावडर आणि तूपाचं मिश्रण बनवण्यासाठी एक चमचा तूपात चिमुटभर काळे मिरे पावडर मिक्स करून रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करावं. 

यातून आरोग्याला लाभ मिळावे म्हणून नेहमीच हाय क्वालिटी असलेले काळे मिरे आणि शुद्ध तूपाचा वापर करावा. हेही ध्यानात ठेवा की, कोणतेही घरगुती उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
 

Web Title: Amazing health benefits of eating black pepper powder with ghee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.