ओवा तर रोज खात असाल पण हे फायदे माहीत आहेत का? वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 01:11 PM2024-01-18T13:11:17+5:302024-01-18T13:12:01+5:30

Ajwain Benefits : तुम्ही तुमच्या किचनमधील एका पदार्थाचं सेवन करून या समस्या दूर ठेवू शकता. हा पदार्थ म्हणजे ओवा.

Amazing health benefits of eating Ajwain, know the right method | ओवा तर रोज खात असाल पण हे फायदे माहीत आहेत का? वाचून व्हाल अवाक्...

ओवा तर रोज खात असाल पण हे फायदे माहीत आहेत का? वाचून व्हाल अवाक्...

Ajwain Benefits : बदलत्या वातावरणात सगळ्यांनाच सर्दी-खोकला, ताप, इन्फेक्शन होणं कॉमन आहे. जर यातील एक समस्या झाली तरी ती दूर करण्यासाठी आठवडा तर नक्कीच लागतो. यामुळे आपल्या शरीरात थोडी कमजोरी येऊ लागते. अशात वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्यांबाबत आपण सतर्क असलं पाहिजे. तुम्ही तुमच्या किचनमधील एका पदार्थाचं सेवन करून या समस्या दूर ठेवू शकता. हा पदार्थ म्हणजे ओवा.

ओवा खाण्याचे फायदे

ओवा हा तसा प्रत्येक घरात असतो. लोक वेगवेगळ्या प्रकारे याचं सेवन करतात. कुणी पदार्थाला टेस्ट आणण्यासाठी तर कुणी जेवण झाल्यावर मुखवास म्हणून याचं सेवन करतात. ओवा उष्ण असतो, त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे याचं सेवन केलं तर सर्दी, खोकला लगेच दूर होऊ शकतो.

ओवा खाण्याची पद्धत

ओव्याचं सेवन तुम्ही तो वेगवेगळ्या पदार्थात मिक्स करून करू शकता. तसेच काही हेल्थ एक्सपर्ट ओव्याचा चहा पिण्याचा सल्ला देतात. हा चहा तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा टाकून उकडून घ्या. नंतर हे पाणी गाळून घ्या आणि त्याल मध व लिंबाचा रस टाकून सेवन करा. याने शरीराला उष्णता मिळेल आणि वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्या दूर होतील.

ओवा खाण्याचे फायदे

1) ओवा खाल्ल्याने बदलत्या वातावरणात अनेक प्रकारच्या संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. इन्फेक्शपासून याने बचाव केला जातो. त्यामुळे ओव्याचं नियमितपणे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

2) बदलत्या वातावरणात सर्दी-खोकला-ताप होणं कॉमन आहे. अशात ओव्याचा तयार केलेला चहा घेतला तर या समस्या लगेच दूर होतील. कारण याने शरीरात जमा झालेला कफ बाहेर येतो.

3) ओव्या वापर नेहमीच पोटदुखी आणि बद्धकोष्टतेची समस्या दूर करण्यासाठी केला जातो. जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर ओव्याचं सेवन नक्की करा.

4) ओव्यामध्ये थायमोल नावाचं तत्व असतं. जे तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट करतं. जेव्हा तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं तेव्हा नवीन फॅट तयार होत नाही आणि जुनं फॅट सहजपणे बर्न होतं. त्यामुळे ओव्याच्या सेवनाने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.

5) ओव्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात. जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. यावर झालेल्या शोधातून समोर आलं की, यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर अशतात. जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

Web Title: Amazing health benefits of eating Ajwain, know the right method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.