शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बटर किंवा लोण्याऐवजी आहारमध्ये या पदार्थांचा समावेश करणं ठरतं फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 12:56 PM

कोणत्याही पदार्थांची चव वाढविण्यासाठी अनेकजण त्यामध्ये बटर किंवा लोणी एकत्र करतात. मग ती दाल मखनी असो किंवा पावभाजी. पनीर बटर मसाला असो किंवा बटर पराठा.

(Image Credit : irishtimes.com)

कोणत्याही पदार्थांची चव वाढविण्यासाठी अनेकजण त्यामध्ये बटर किंवा लोणी एकत्र करतात. मग ती दाल मखनी असो किंवा पावभाजी. पनीर बटर मसाला असो किंवा बटर पराठा. पण तुम्हाला माहीत आहे का? बाजारात मिळणारं बटर हे अपेक्षेपेक्षा जरा जास्तच खारट असतं. ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पण काय कराल शेवटी बटरचा मोह सोडवत नाही. पण तुम्ही तुमच्या चवीशी अजिबात कॉम्प्रोमाइज न करता बटरऐवजी स्वयंपाकघरातील काही इतर पदार्थ वापरून स्वतःला हेल्दी ठेवू शकता. 

(Image Credit : Southern Living)

बटरच्या अतिवापरामुळे होऊ शकतो धोका :

लोणी किंवा बटरमध्ये सॅच्युरेटेड फॅट (saturated fat) अधिक प्रमाणात असतं. ज्यामुळे धमन्या बंद होऊ शकतात. तसेच दररोजच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर बटरचा समावेश करणं प्लाक बिल्ड-अपचं कारण ठरू शकतं. एवढचं नाही तर बाजारामध्ये मिळणाऱ्या बटरच्या विविध ब्रँड्समध्ये मोठ्या प्रमाणावर मीठ आणि आर्टिफिशिअल फ्लेवर्सचा वापर करण्यात येतो. 

बटरऐवजी तुम्ही या पदार्थांचा करू शकता वापर :

तूप 

आयुर्वेदामध्ये प्राचीन काळापासूनच तूप आरोग्यवर्धक फॅट्सचा स्त्रोत मानला जातो. अनेक तज्ज्ञांच्या मते आणि काही अध्ययनांमधून सिद्ध झाल्यानुसार, तूपाचा आहारामध्ये योग्य प्रमाणात समावेश केल्याने हृदय रोगाचा धोका कमी होतो. तूपामध्ये अस्तित्वात असलेलं  कॉन्जुगेटिड लिनोलिक अॅसिड हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. टाइप टू डायबिटीजने पीडित असणाऱ्या व्यक्तींमध्ये याचा धोका अधिक असतो. याव्यतिरिक्त असं सांगण्यात येतं की, तांदळासारख्या कार्बोहायड्रेट कमी प्रमाणात असणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये तूपाचा समावेश केल्याने त्यांच्यामध्ये असणारी साखर पचवण्यासाठी मदत करतं. 

खोबऱ्याचं तेल 

उत्तर भारतामध्ये हे थोडं विचित्र वाटत असलं तरिही दक्षिण भारतामध्ये मात्र जेवण तयार करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करण्यात येतो. खोबऱ्याचं तेल पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी फायदेशीर ठरतं. नारळाचं तेल सेबमप्रमाणे असतं. जे शरीरामध्ये एक तेल तयार होत असतं. जे स्काल्प ड्राय होण्यापासून वाचवतं. एवढचं नाही तर केसांच्या मुळांना नुकसान पोहोचवत नाही. नारळाच्या तेलाचा वापर केल्याने वजन कमी होतं. ताज्या खोबऱ्याच्या तेलामध्ये इतर तेलांपेक्षा जास्त प्रमाणात मीडियम चेन फॅटी अ‍ॅसिड (70 ते 85 टक्के) असतं.  मीडियम चेन फॅटी अ‍ॅसिड अगदी सहज ऑक्सीडाइज्ड लिपिड्स होतात आणि एडीपोज ऊतकमध्ये संग्रहित होत नाही. याप्रकारे मुख्य स्वरूपात मीडियम चेन फॅटी अ‍ॅसिडयुक्त नारळाचं तेल वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलचा वापर केल्याने अनेक आजार दूर करण्यास मदत होते. हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांसाठी हे फायदेशीर ठरतं. कारण हे शुगर लेबल कमी करण्यासाठी मदत करतं. ऑलिव्ह ऑिलचा वापर लहान मुलांची मालिश करण्यासाठीही करण्यात येतो. ऑलिव्ह ऑइल डिप्रेशन, खॅन्सर, मधुमेह नियंत्रित करण्याचं काम करतो. ऑलिव्ह ऑइल त्वचेसाठीही उत्तम ठरतं. 

टिप : वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स