शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

Kidney Infection : 24 वर्षीय अभिनेत्री शिवांगी जोशीला झालं Kidney Infection, जाणून घ्या याची कारणं आणि लक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 13:15 IST

Kidney Infection Symptoms and Reason : शिवांगीने नुकताच किडनी इन्फेक्शनवर उपचार केला. तिने बरी झाल्यानंतर आपल्या फॅन्सना सल्ला दिला आहे की, तुम्ही शरीर, मेंदू आणि आत्म्याची काळजी घेतली पाहिजे.

Kidney Infection Symptoms and Reason  :  हायड्रेट राहणं म्हणजे भरपूर पाणी पिणं शरीराच्या आरोग्यासाठी फार गरजेचं असतं. असं केलं नाही तर शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. शरीरात पाणी कमी झालं तर किडनीला इन्फेक्शन, किडनी स्टोन आणि किडनीसंबंधी इतरही गंभीर समस्या होऊ शकतात. याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी (Shivangi Joshi) आहे.

शिवांगीने नुकताच किडनी इन्फेक्शनवर उपचार केला. तिने बरी झाल्यानंतर आपल्या फॅन्सना सल्ला दिला आहे की, तुम्ही शरीर, मेंदू आणि आत्म्याची काळजी घेतली पाहिजे. सगळ्या महत्वाचं म्हणजे हायड्रेटेड राहिलं पाहिजे. शिवांगी जोशीला तुम्ही ओळखत असाल तर ती एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत काम केलं आहे. इन्स्टावर तिची फॅन फॉलोईंगही भरपूर आहे. तिने तिच्या इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली आहे. ती सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. 

शिवांगीने पोस्टमध्ये सांगितलं की, ती किडनीच्या इन्फेक्शनमुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाली होती. फोटोत ती नारळाचं पाणी पिताना दिसत आहे. बरी झाल्यावर तिने फॅन्सचे आभार मानले आणि सगळ्यांना हायड्रेटेड राहण्याचा सल्ला दिला आहे.

सध्या वेगाने वाढत असलेलं तापमान आणि या वातावरणात हायड्रेट राहण्याचा सगळ्यात जास्त धोका आहे. सामान्यपणे या वातावरणात किडनी इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. उन्हाळ्यात अधिक घाम येत असल्याने शरीरात पाणी कमी होतं, ज्याचा थेट प्रभाव किडनींवर पडतो.

काय असतं हे किडनी इन्फेक्शन?

किडनीमध्ये इन्फेक्शन तेव्हा होतं जेव्हा लघवीच्या मार्गात ई.कोलाई (E.Coli) मुळे बॅक्टेरिअल इन्फेक्शन होतं. बॅक्टेरिया लघवीच्या मार्गातून शरीरात प्रवेश करतात आणि किडनीपर्यंत पोहोचतात. याने इन्फेक्शन होतं.

किडनी इन्फेक्शनची लक्षण?

- हे इन्फेक्शन झालं की, पाठीच्या खालच्या भागात आणि पोटाखाली वेदना होते.

- ओटीपोटाच्या आसपास वेदना आणि अस्वस्थता जाणवते

- इन्फेक्शन झालं तर रूग्णाला ताप येतो

- तापासोबतच थरथरी आणि थंडी वाजते

- खूप जास्त कमजोरी जाणवते

- भूक कमी लागते

- सुस्ती येते

- काही केसेसमध्ये रूग्णांना डायरिया होतो

हायड्रेट राहणं का गरजेचं?

किडनी इन्फेक्शनने पीडित लोकांना सामान्यपणे भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण याने किडनीतून बॅक्टेरिया बाहेर काढण्यास मदत मिळते. त्यांना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला तोपर्यंत दिला जातो जोपर्यंत त्यांना डार्क रंगाची आणि दुर्गंधी येणारी लघवी येणं बंद होत नाही.

डिहायड्रेशन झाल्यावर का वाढतो धोका?

NCBI च्या एका रिपोर्टनुसार, (Ref) डिहायड्रेशन होणे म्हणजे पाणी कमी पिणे किंवा न पिणे यामुळे तुम्हाला यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) चा धोका होऊ शकतो. इतकंच नाही तर आवश्यक तेवढं पाणी प्यायले नाही तर किडनी डिजीज आणि किडनी फेलिअरचा धोकाही असतो. लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे, पुन्हा-पुन्हा लघवी लागणे, लघवी करूनही बरं न वाटणे, लघवीतून रक्त येणे, लघवीतून दुर्गंधी येणे आणि पोटाच्या खालच्या भागात वेदना होणे ही याची लक्षण आहेत.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य