कमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स

By manali.bagul | Published: January 27, 2021 02:48 PM2021-01-27T14:48:11+5:302021-01-27T15:07:14+5:30

फॅट, कार्ब्स कमी करण्यासाठी कोणतंही खास डाएट करत असाल तर तुम्हाला डायटींग केल्यामुळे शरीराला कोणत्या प्रकारच्या नुकसानांचा सामना करावा लागतो याबबत  माहिती असणं गरजेचं आहे. 

8 dangerous side effects of going on a diet to lose weight | कमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स

कमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स

Next

(Image Credit- Getty Images)

वजन कमी करण्यासाठी तासनतास उपाशी राहणं हे शरीरासाठी योग्य ठरत नाही. आपले कॅलरीज काऊंट कमी करण्याचा हा सगळ्यात चुकीचा मार्ग आहे. वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यानुसार यातून शरीराला पोषक तत्व मिळण्यास समस्या निर्माण होतात. याचे वेगवेगळे साईड इफेक्ट्स सुद्धा आहेत तुम्ही किटजेनिक डाएट, इंटरमिटेंट फास्टिंग किंवा फॅट, कार्ब्स कमी करण्यासाठी कोणतंही खास डाएट करत असाल तर तुम्हाला डायटींग केल्यामुळे शरीराला कोणत्या प्रकारच्या नुकसानांचा सामना करावा लागतो याबबत  माहिती असणं गरजेचं आहे. 

मेटाबॉलिजमवर वाईट परिणाम

नॅशल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार डायएटिंगमुळे लोकांच्या मेटाबॉलिजमवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. कारण शरीरातील लॅप्टीन हार्मोन्समुळे अशी समस्या उद्भवते.  ज्याचा संबंध माणसाच्या भूकेशी असतो. डायटींग केल्यानं शरीरातील या हार्मोन्सचा स्तर वाढतो. 

 कमकुवत मासपेशी

डायटिंगमुळे आपल्या मासपेंशीवर खूप वाईट परिणाम होतो. द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशियनने दिलेल्या माहितीनुसार युनिव्हर्सिटी ऑफ किलच्या संशोधकांनी  ३२ निरोगी स्वयंसेवकांची निवड केली होती. त्यांच्या आहारातून  १३०० कॅलरीच कमी करण्यास सांगितले होते. एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार मासपेशीमध्ये कमकुवतपणा आल्यानं त्यांचे वजन कमी झाले होते. 

किडनी स्टोन

डाएटमुळे शरीरारीतील न्यूट्रीशनच्या कमतरतेमुळे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर वाईट परिणाम होत असतो.  हेल्थ एंड वेलनेस कोच एश्र्वी वॅन बसकिर्क यांनी दिलेल्या माहितीनुसार काही वस्तूंमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण आहारातून अशा वस्तूंना वगळतो तेव्हा डिहायड्रेशच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे माणसांना  किडनी स्टोनच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. 

मेटाबॉलिज्म पर बुरा असर

कमजोर हाडं

एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त लोक इंटसमिटेंट फास्टिंग करण्याचा प्रयत्न  करतात. त्यामुळे वजन कमी होऊ शकतो.  जर तुम्ही आधीच अंडरवेट असाल तर समस्या वाढू शकते. ब्रिघममधील डिपार्टमेंट ऑफ न्यूट्रिशनच्या रिजनल डायरेक्टर कॅथी मॅक्नस यांनी दिलेल्या माहितीनुसार  असं केल्यानं रोगप्रतिराकशक्ती आणि हाडांना नुकसान पोहोचू शकतं. 

केस गळणं

डर्मटोलॉजी  प्रक्टिकल कॉन्सेप्चुअलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार लो कॅलरी डाएट आपल्या केसांच्या गळण्याच्या समस्येशी निगडीत असतो. पोषक घटकांच्या कमतरतेमुळे शरीराची रचना आणि हेअर ग्रोथ या दोन्हींवर नकारात्मक परिणाम होतो. 

Coronavirus: काेराेनामुक्त नागरिकांना सतावतेय वजन वाढण्याची समस्या; सरकारी रुग्णालयात तक्रार नाही

थकवा येणं

जर तुम्ही कमी खात असाल तर सहाजिकच तुम्हाला थकवा लगेच येत असेल. एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिनच्या एका रिपोर्टनुसार कार्बोहायड्रेट्स कमी केल्यामुळे थकवा जाणवतो.  किटोजेनिक डाएटवर आधारित जर्नल ऑफ द अमेरिकन डायएटिक असोशियेशच्या एका रिपोर्टनुसार लो  कार्बोहायड्रटेसमुळे शरीरातील एनर्जी लेव्हल कमी असते.  त्यामुळे लवकर थकवा येतो. आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. 

अति धुम्रपान करणाऱ्यांमध्ये ८९ टक्क्यांनी वाढतोय कोरोनामुळे मृत्यूचा धोका; नवीन संशोधनातून खुलासा

इटींग डीसॉर्डर

शरीराच्या गरजा जाणून न घेता आहारात बदल करणारे लोक अनेकदा इटींग डिसॉर्डरचे शिकार होऊ शकतात. युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटीमध्ये इटींग डिसॉर्डरच्या अभ्यासाशी जोडलेल्या ऐना गुएर्जीकोवा यांनी सांगितले की, ''अशी समस्या पुढे एंजायटी किंवा डिप्रेशनचं कारण ठरू शकते. म्हणून आहारात पोषक तत्वांचा समावेश करणं गरजेचं आहे.''

(टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहिती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. )

Web Title: 8 dangerous side effects of going on a diet to lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.