बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं असं वाटतं का? मग हे वाचाच....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 10:52 AM2019-09-12T10:52:48+5:302019-09-12T10:56:39+5:30

तुम्ही नेहमीच लोकांना हे सांगताना ऐकलं असेल की,  जर तुम्ही वजन करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्ही कार्बोहायड्रेट्सपासून दूर रहा किंवा फार कमी प्रमाणात सेवन करा.

5 day potato diet will help you lose weight | बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं असं वाटतं का? मग हे वाचाच....

बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं असं वाटतं का? मग हे वाचाच....

googlenewsNext

तुम्ही नेहमीच लोकांना हे सांगताना ऐकलं असेल की,  जर तुम्ही वजन करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्ही कार्बोहायड्रेट्सपासून दूर रहा किंवा फार कमी प्रमाणात सेवन करा. तसेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक बटाट्यापासूनही दूर राहतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला बटाट्याची एक खास डाएट सांगणार आहोत, ज्यात ५ दिवसांपर्यंत केवळ बटाटे खायचे आहेत.

रोज खा बटाटे

जर्नल मॉलिक्युलर ऑफ न्यूट्रिशन अ‍ॅन्ड फूड रिसर्चमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, जर वजन कमी करायचं असेल तर रोज बटाटे खा. इतकेच नाही तर तुम्ही ५ दिवस केवळ बटाटे खा, याने तुमचं वजन कमी होईल असाही दावा या रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. याचं कारण म्हणजे बटाटे खाल्ल्यानंतर भूकेची सतत जाणीव होत नाही. भूक लागत नाही. तसेच पोट लवकर भरतं आणि तुम्ही ओव्हरइंटिंग करणार नाहीत.

कॅलरी होतात कमी

या नव्या रिसर्चनुसार, बटाटे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात, कारण हे एक असं स्टार्ची फूड आहे ज्यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जास्त असतं. आणि कॅलरी कमी असतात. सोबतच मेटाबॉलिज्मला वाढवण्यासोबतच वजन कंट्रोल करण्यासही याने मदत मिळते.

वजन कमी करतं, आरोग्यही राहतं चांगलं

एका मध्यम आकाराच्या बटाट्यात १६८ कॅलरी असतात तर उकडलेल्या बटाट्यात केवळ १०० कॅलरी असतात. तज्ज्ञांचं असं मत आहे की, बटाट्याने वजन कमी होतं, मात्र आरोग्याचं नुकसान होत नाही. बटाटे तुम्ही दिवसातून १० जरी खाल्लेत तरी तुम्ही इतर पदार्थांपेक्षा कमीच कॅलरी यातून सेवन कराल. सोबतच हेल्दीही रहाल.

पोषक तत्व

बटाट्यामध्ये फायबर आणि प्रोटीनऐवजी व्हिटॅमि बी, सी, आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नीज, फॉस्फोरससारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. उकडलेले दोन-तीन बटाटे सालीसह दह्यासोबत खाल्ले एक संपूर्ण आहार तुम्हाला मिळेल.

बटाटे नाही, चिकटणामुळे लठ्ठपणा

बटाटे तळून मसाले लावून, तूप लावून खाल्लेत तर चिकट पदार्थ पोटात जातात. यानेच लठ्ठपणा वाढतो. बटाट्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही. 

बटाट्याची साल फायदेशीर

बटाट्याची साल अनेकजण फेकून देतात. पण बटाट्याची साल खाल्ल्याने जास्त शक्ती मिळते. इतकेच काय तर बटाटे ज्या पाण्यात उकडले ते पाणीही फेकू नका. त्याचा भाजीचा रस्सा तयार करावा. या पाण्यात भरपूर मिनरल्स आणि व्हिटॅमिन असतात.

Web Title: 5 day potato diet will help you lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.