तोंडाच्या दुर्गंधीची आता चिंता सोडा, 'या' १० नैसर्गिक अन् घरगुती उपायांशी नातं जोडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 10:19 AM2019-11-15T10:19:57+5:302019-11-15T10:20:18+5:30

अनेकजण तोंडाच्या दुर्गंधीमुळे वैतागलेले असतात. तोंडाला दुर्गंधी येण्याचं कारण तोंडातील एक बॅक्टेरिया असतो. या बॅक्टेरियातून निघणा-या सल्फर कम्पाउंडमुळे तोंडाची दुर्गंधी येते.

10 tips to get rid off bad breath naturally | तोंडाच्या दुर्गंधीची आता चिंता सोडा, 'या' १० नैसर्गिक अन् घरगुती उपायांशी नातं जोडा!

तोंडाच्या दुर्गंधीची आता चिंता सोडा, 'या' १० नैसर्गिक अन् घरगुती उपायांशी नातं जोडा!

googlenewsNext

अनेकजण तोंडाच्या दुर्गंधीमुळे वैतागलेले असतात. तोंडाला दुर्गंधी येण्याचं कारण तोंडातील एक बॅक्टेरिया असतो. या बॅक्टेरियातून निघणा-या सल्फर कम्पाउंडमुळे तोंडाची दुर्गंधी येते. जर तुम्ही कुणाशी बोलत असाल आणि अशावेळी तुमच्यासाठी तो क्षण लाजिरवाणा ठरतो. यामुळे अनेकजण तुम्हाला टाळायला लागतात. अनेकांना हेही माहीत नसतं की, त्यांच्या तोंडाची दुर्गंधी येते. पण ही समस्या तुम्ही काही सोप्या उपायांनी दूर करु शकता.

1) च्युइंगम

च्युइंगम खाल्ल्याने अधिक प्रमाणात लाळ निर्माण होते. यासोबतच जिभ आणि दातही स्वच्छ होतात. तसेच यामुळे तोंडातील फूड पार्टिकल्स आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. अशात तुम्ही शुगर फ्रि च्युइंगम खायला हवं. जेवताना लसून आणि कांदा खाल्ल्यास तोंडाचा वास अधिक येतो. अशावेळी सोबत च्युइंगम ठेवावं.  

2) पुदीना

पुदीन्याची काही पाने खाल्ल्यास तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते. त्यासोबतच तुम्ही लिस्टरीनचाही वापर करु शकता. या पानांच्या ताज्या व थंडगार सुगंधामुळे तुम्हाला अधिक फ्रेश वाटू शकते.यासाठी पुदिन्याची काही पाने चघळा अथवा एक कप पुदिन्याचा चहा घ्या.

3) पनीर आणि सफरचंद

(Image Credit : teluguone.com)

योग्य पदार्थ खाल्ल्यास तुमचे दात चांगले राहतील. उलटसुलट काही खाण्यात आलं तर दातांची समस्या होऊ शकते. खासकरुन सोडा जास्त प्रमाणात घेऊ नका. त्यामुळे स्नॅक म्हणून पनीर, शेंगदाणे आणि सफरचंद खावे. यामुळे लाळ मोठ्या प्रमामात तयार होते. 

4) बडीशेप

जेवण झाल्यावर ब-याचदा आपल्याकडे बडीसोप खाण्याची पद्धत आहे. ही बडीशेफ खाल्याने पचनशक्ती सुधारते. बडीशेफ एक उत्तम माऊथफ्रेशनर देखील आहे. बडीशेफमुळे अधिक प्रमाणात लाळ निर्माण होते व जंतूंचा नाश होतो ज्यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही. जेवणानंतर येणारे आंबट ढेकर व अॅसिडीटी बडीसोपमुळे कमी होते. दररोज थोडी बडीशेफ चघळल्यामुळे तुमच्या तोंडातून चांगला सुगंध येऊ शकतो. 

5) पार्सली

तुम्ही पार्सली तुमच्या खाद्यपदार्थांच्या सजावटीसाठी वापरु शकता.पार्सलीमधील क्लोरोफील हा घटक जंतुनाशक आहे. त्यामुळे जेवणाच्या शेवटी पार्सली खाल्यास तुमच्या तोंडाचा दुर्गंध कमी होईल. पार्सलीच्या तेलाचा वापर माऊथ फ्रेशनर,साबण व परम्युममध्ये सुगंधासाठी करण्यात येतो.

6) लवंग

स्वयंपाकामध्ये लवंग चव व सुगंधासाठी वापरण्यात येते.पुर्वीपासून दातदुखत असल्यास लवंग वापरण्यात येत असल्यामुळे आजकाल टूथपेस्ट व माऊथवॉश मध्ये देखील लवंग वापरण्यात येते. लवंगमुळे तोंडाचा दुर्गंध कमी होतो कारण तिच्यामध्ये अॅन्टीबॅक्टेरीयल घटक असतात. तुम्ही कधीतरी एखादी लवंग नक्कीच चघळू शकता.

7) दालचिनी

हा एक मसाल्याचा पदार्थ आहे.दालचिनीमध्ये देखील अ‍ॅन्टीबॅक्टेरीयल घटक असल्यामुळे त्यामुळे तोंडाचा दुर्गंध कमी होतो. यासाठी तुम्ही एखादा दालचिनीचा तुकडा चघळू शकता किंवा दालचिनीचा एक कप चहा घेऊ शकता. त्याचप्रमाणे दालचिनीचे तुकडे पाण्यात उकळून ते तुम्ही माऊथवॉश करण्यासाठी देखील वापरु शकता.

8) वेलची

वेलचीला एक गोडसर व अ‍ॅरोमिक सुगंध येतो. त्यामुळे तुमच्या तोंडाला दुर्गंध येत असल्यास तोंडात वेलची ठेवा. किंवा जेवल्यानंतर वेलची टाकलेला चहा घेण्यास हरकत नाही.

9) लिंबूवर्गीय फळे

संत्री, लिंबू या फळांमुळे तुमच्या लाळग्रंथीला चालना मिळते व भरपूर लाळ निर्माण होते. लाळेतील अॅसीड घटकांमुळे तोंडातील मृतपेशी व अन्नघटक दूर होतात.

10) धने अथवा कोंथिबीर

स्वयंपाकातील कांदा व लसूण या पदार्थांमुळे तोंडाला उग्र वास येतो. पण अन्नपदार्थावर कोथिंबीर टाकल्याने हा दुर्गंध कमी होऊ शकतो. जेवणानंतर कोथिंबीरींची काही पाने चघळा त्यामुळे तोंडांचा दुर्गंध निघून जाईल. किंवा चिमूटभर मीठासोबत धणे तव्यावर रोस्ट करा व चघळा.


Web Title: 10 tips to get rid off bad breath naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.