शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक १०० मध्ये १० रुग्ण फुप्फुसाच्या कॅन्सरचे; ‘पॅसिव्ह स्मोकिंग’ही धोकादायकच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 07:40 IST

१ ऑगस्ट  हा दिवस जगभरात जागतिक फुप्फुस कर्करोग (लंग कॅन्सर) दिन म्हणून पाळला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात साधारणपणे १०० कॅन्सर रुग्णांमध्ये १० ते १२ रुग्ण फुप्फुसाच्या कॅन्सरने पीडित आहेत. यातील ९० टक्के फुप्फुसाचा कर्करोग हा धूम्रपानामुळे होतो, असे निरीक्षण ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट व डॉ. परिमल देशपांडे यांनी नोंदविले. सोबतच कर्करोग टाळण्यासाठी धूम्रपान व प्रदूषण टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला. 

१ ऑगस्ट  हा दिवस जगभरात जागतिक फुप्फुस कर्करोग (लंग कॅन्सर) दिन म्हणून पाळला जातो. दरवर्षी जवळपास ७० हजार नव्या फुप्फुसाच्या कॅन्सर रुग्णांची भर पडते. यात महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक आहे. डॉ. अरबट म्हणाले की, ‘लंग कॅन्सर’चे सर्वात मोठे कारण हे धूम्रपान आहे. अन्य कारणांमध्ये आनुवांशिकता, प्रदूषण किंवा प्रदूषित हवेत सततचा वावर, मग तो कंपन्यांमध्ये असो, वा वातावरणातील असो. याशिवाय, दीर्घकालीन फुप्फुसांचे विकार आदी, या कॅन्सरला कारणीभूत ठरतात.

२०३० पर्यंत लंग कॅन्सरचे प्रमाण वाढण्याची शक्यतासध्या भारतात एकूण कॅन्सरमध्ये १० ते १२ टक्के लंग कॅन्सरचे रुग्ण आढळून येत असले तरी २०३० पर्यंत हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे. कर्करोगाचा संसर्ग एकाच फुप्फुसात झाला तर उपचारांनी तो बरा होतो. परंतु दोन्ही फुप्फुसांमध्ये कॅन्सर पसरला तर धोका वाढतो.

या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोश्वसनरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्निल बाकमवार म्हणाले, फुप्फुसांच्या कर्करोगाच्या पूर्वलक्षणांमध्ये दीर्घकाळ खोकला व कफ असणे, खोकल्याद्वारे आणि कधी थुंकीद्वारे रक्त येणे, श्वास घेताना त्रास होणे, आवाजात बदल होणे, सतत फुप्फुसाचे इन्फेक्शन व न्यूमोनिया होणे. सोबतच दीर्घकाळ ताप असणे, अशक्तपणा, वजन कमी होणे ही लक्षणेही आढळून येतात.

चौथ्या स्टेजमध्ये वाढते गुंतागुंतीचे प्रमाणश्वसनरोग तज्ज्ञ डॉ. परिमल देशपांडे म्हणाले, या कर्करोगामध्ये तिसऱ्या स्टेजपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के इतके आहे. चौथ्या टप्प्यात मात्र गुंतागुंत वाढते. यामुळे लक्षणे दिसताच निदान होणे व उपचार घेणे महत्त्वाचे ठरते.

‘पॅसिव्ह स्मोकिंग’, जो सिगारेटमधून निघणारा धूर आणि धूम्रपान करणाऱ्याने सोडलेला धूर यांचे मिश्रण आहे. जेव्हा तुम्ही ते ‘इनहेल’ करता, तेव्हा तुम्ही धूम्रपान करणाऱ्यांसारख्याच कर्करोगास कारणीभूत घटकांच्या संपर्कात असता.- डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ

टॅग्स :cancerकर्करोग