अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 16:13 IST2021-12-10T16:11:15+5:302021-12-10T16:13:05+5:30
सुनील मांढरे हा बहीण व मैत्रिणीसोबत देवरी तालुक्यातील भर्रेगाव परिसरातून येत असताना, महामार्गावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये सुनील जागीच ठार झाला, तर बहीण व मैत्रीण गंभीर जखमी झाल्या.

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार
गोंदिया : आपल्या बहीण व मैत्रिणीला घेऊन जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी चालक तरुण विद्यार्थी जागीच ठार झाला. सुनील मांढरे (रा.भर्रेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
देवरी येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयातील १२ वीतील विद्यार्थी सुनील मांढरे हा बहीण व मैत्रिणीसोबत देवरी तालुक्यातील भर्रेगाव परिसरातून येत असताना, महामार्गावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये सुनील जागीच ठार झाला, तर बहीण व मैत्रीण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (दि.१०) सकाळी घडलेल्या या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी येथे हलविण्यात आले आहे.