अनोखं आंदोलन! रस्त्यातल्या खड्ड्यांमध्ये लावणी करून संताप व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 14:38 IST2020-08-23T14:36:46+5:302020-08-23T14:38:32+5:30

कोहमारा-गोंदिया मार्गावर खड्डेच खड्डे; तरुणांनी अनोखं आंदोलन करून वेधलं लक्ष

youth in gondia agitates against potholes on road | अनोखं आंदोलन! रस्त्यातल्या खड्ड्यांमध्ये लावणी करून संताप व्यक्त

अनोखं आंदोलन! रस्त्यातल्या खड्ड्यांमध्ये लावणी करून संताप व्यक्त

गोंदिया: तालुक्यातील गोंदिया-कोहमारा - नवेगावबांध मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे  वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. पण अद्यापही या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी कोहमारा येथील युवकांनी आज (दि.23) रस्त्यावरील खड्ड्यात रोवणी रोवून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

कोहमारा ते नवेगावबांध या रस्त्याचे काम लवकरात लवकर करा अन्यथा आम्ही लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा युवकांनी दिला आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली व त्यामुळे दरवर्षी अपघात होऊन दोन तीन जणांचा बळी गेला आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे प्रशासनाने व बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देवून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

Web Title: youth in gondia agitates against potholes on road

टॅग्स :Potholeखड्डे