पावसाळ्यात जलाशयात खूप वाहत पाणी असून अशात बोटीवर फिरत असताना काही जण बोटीच्या एकाच बाजूवर जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात. अशात बरेचदा नाव उलटत असते. काहींना बोटीवर उभे राहून सेल्फी काढण्याचा मोठा नाद असतो, परंतु हा मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून बोटीवर सेल्फी आणि पाण्याशी खेळ नकोच.
..........
धोका पत्करू नका
पर्यटकांनी पहाडावर किंवा मोठ्या दगडावर चढूृ नये, शिवाय पहाडावरुन सतत पाणी पाझरत असून चढता उतरता मोठा धोकादायक असते. काही लोक झाडाच्या फांद्या पकडून वर चढण्याचा प्रयत्न करतात. परंतु पावसाळ्यात झाडाचे बुड कमजोर झालेले असतात तसेच फांद्यावरुन हात घसरतो आणि अपघात झाल्यास खाली पाण्यात पडण्याची भीती असते.
..........
आतापर्यंत अनेकांचे बळी
मागील सहा सात वर्षात हाजराफाॅलमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समितीची देखरेख वाढली असून येथील नवयुवक ठिकठिकाणी नजर ठेवून असतात. त्यामुळे येथे अपघात कमी झाले. परंतु त्या आधी दोन दशकात अनेक तरुणांना आपले जीव गमवावे लागले. तेही पहाडीवरुन तलावात पडून बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
.......
‘मागील काही दिवसापासून सतत पाऊस पडत असून नदी नाल्यांची पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे हाजराफाॅलला पाण्याची पातळी वाढली असून तलावात सुध्दा पाणी वाढले असून प्रवाहाचा वेग सुध्दा वाढला आहे. अशात पर्यटकांनी सेल्फी काढण्यासाठी जवळ जाऊ नये तसेच पहाडावर अजिबात चढू नये.
अभिजित इलमकर, वनपरिक्षेत्राधिकारी सालेकसा.