शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

जगाच्या पोशिंद्याची दिवाळी अंधारात

By admin | Updated: October 22, 2014 23:21 IST

हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा व महत्वाचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीची धूम तालुका स्थळापर्यंत दिसून येत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुल्ल झाली आहे. या सर्व धामधूमीत मात्र

एच. के. फुंडे ल्ल कालीमाटीहिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा व महत्वाचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीची धूम तालुका स्थळापर्यंत दिसून येत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुल्ल झाली आहे. या सर्व धामधूमीत मात्र जगाचा पोशींदा शेतकरी आपल्या घरात बसून आहे. हाती पैसा नसल्याने खरेदी तर दूरच दोन वेळच्या जेवणासाठी तो चिंतातून आहे. एकंदर जगाच्या पोशिंद्याची दिवाळी अंधारातच आहे. दिवाळी म्हटली की, नवनवीन वस्तूंची खरेदी आली. त्यानुसार बाजारपेठ गर्दीने फुगून गेली आहे. आमगाव या तालुकास्थळीही बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. ही गर्दी दिसून येत आहे ती शासकीय अधिकारी, कर्मचारी व व्यवसायीकांची. मात्र अवघ्या देशासह तालुक्याची अर्थव्यवस्था चालविणारा शेतकरी या गर्दीतून नदारद असून तो घरीच बसला आहे. यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना धानाची दुबार पेरणी करावी लागली. धानाला उशीर झाल्याने पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला. बँक व सावकारांचे कर्ज डोक्यावर असताना उत्पादनाची आस धरून शेतकऱ्यांनी पुन्हा कर्जाचा डोंगर उचलला व शेतीची मशागत केली. काही ठिकाणी रोवण्या खोळंबल्याचा फटका उत्पादनाला बसला आहे. दरवर्षी दिवाळीमध्ये हलका धान शेतकऱ्याच्या हाती लागतो. यातून शेतकरी कसाबसा दिवाळी साजरी करायचा. परंतू यावर्षी मात्र हलके धानही शेतकऱ्याच्या हाती लागले नसल्याने शेतकरी रिकाम्या हातीच आहे. दिवाळीत कपडे, दागिने व चैनीच्यावस्तूंची खरेदी केली जाते. मात्र ही खरेदी फक्त अल्पशा कुटूंबातच केली जात असल्याचे दिसून येत आहे. तर शेतकरीवर्गाकडे लक्ष्मीपूजनासाठीही लक्ष्मी नसल्याने त्यांची दिवाळी थंड आहे. शेतकऱ्यांना फक्त शेतमालाच्या उत्पादनातूनच हे सर्व शक्य आहे. शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीला बोनस मिळतो. व्यापारीही आपल्या व्यवसायातून लाखोंची उलाढाल करून मालामाल होतात. परंतू उभ्या जगाचा पोशिंदा मात्र आपली दिवाळी अंधारातच साजरी करतो. आम्हाला बोनस कधी मिळणार व तो कोण देणार, सरकार की निसर्ग अशी आर्त हाकही तो मारू शकत नाही ही व्यथा आहे.