शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन

By admin | Updated: December 18, 2015 02:22 IST

जिल्हा परिषदेचे सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत यांनी आरोग्य विभागाचे कनिष्ठ सहायक आर.एम. भोयर यांना जाळून टाकण्याची धमकी दिली.

अधिकाऱ्याकडून धमकी प्रकरण : जि.प. कर्मचारी महासंघाचे निदर्शनेगोंदिया : जिल्हा परिषदेचे सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत यांनी आरोग्य विभागाचे कनिष्ठ सहायक आर.एम. भोयर यांना जाळून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी गुरूवारी (दि.१७) जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या नेतृत्त्वात जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार नारेबाजी केली. यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक निवेदन दिले.या संदर्भात आरोग्य विभागाचे कर्मचारी भोयर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, १६ डिसेंबरला दुपारी १.३० वाजता मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्याविरूद्ध तक्रार आली. यावर डॉ. गहलोत यांनी डॉ. लांडगे यांच्या बदल संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. चर्चेत भोयर यांनी म्हटले की, बदलीचे अधिकार नागपूर येथील उपसंचालकांना आहेत. यावर गहलोत चिढले व म्हणाले की, बदलीचे अधिकार कोणाला आहेत, याबाबत त्यांना लिखित आदेश दाखविण्यात यावे. त्यांना आदेश दाखविण्यात आले नाही तर ते त्यांना जाळून टाकतील.भोयर यांचे म्हणणे आहे की, यापूर्वी ५ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वाजता त्यांच्याशी आमोरासमोर भेट झाली. यादरम्यान विनाकारण त्यांना कुत्रा असे म्हणण्यात आले. १५ डिसेंबरला डॉ. गहलोतद्वारे बोलाविण्यात आल्यावर ते त्यांच्या कक्षात गेले. मात्र त्यांना कक्षात यायला नको होते, असे म्हणण्यात आले. याबाबत त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही माहिती दिली आहे. डॉ. गहलोत यांच्या दुर्व्यवहारामुळे त्यांची मानसिक स्थिती खराब झाली आहे. सदर निषेध आंदोलनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पी.जी. शहारे, उपाध्यक्ष कार्तिक चव्हाण, आर.डी. वलथरे, अनूप शुक्ला, सुदीप देव, अर्चना अयाचित, दिवाकर खोब्रागडे, एम.आर. मिश्रा, एस.डी. तुरकर, किशोर मुले, अन्विता श्रीवास्तव, संध्या रेटर, कविता लांजेवार, ओ.जे. बिसेन, एस.आर. खत्री यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)