शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतचा अधिकार डावलून संस्थेला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 07:00 IST

जिल्ह्यातील एकाच संस्थेने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा स्थायी समितीत विषय मंजूरीला न ठेवणे, जाहिरात देऊन इतर संस्थांचे अर्ज न मागविणे व संस्थेने बिल्ले लावतांना ३० रुपयांऐवजी ५० रुपये घेणे यात मोठा घोटाळा झाला असल्याचे निदर्शनास येत असल्याचा परशुरामकर यांनी आरोप केला आहे.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : उपमुकाअ राठोड यांचा अजब कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अधिकार नसताना किंवा शासनाचे कोणतेही आदेश नसताना ग्रामपंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायत स्तरावरील घरांवर ‘नंबर प्लेट’ लावण्याचे काम एका संस्थेला दिले. यात सदर संस्थेने प्रति सिक्का ४० ते ५० रुपये घेऊन ऐन अडचणीच्या काळात जनतेवर भुर्दंड बसविला असल्याने या प्रकरणाची चौकशी करून राठोड यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.जिल्ह्यात आठ पंचायत समिती असून ५५४ ग्रामपंचायत आहेत. या ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया घरांना ‘नंबर प्लेट’ लावण्याबाबत शासनाचे कोणतेही आदेश नसून त्याची काही आवश्यकताही नाही. गरज असल्यास तो अधिकार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५४ (३) पोटकलम (१) नुसार ग्रामपंचायतला असून त्यांना हे काम करायचे आहे. परंतु येथे उलटच घडले आहे. जिल्ह्यातील एका बेरोजगार संस्थेने प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांच्याशी संपर्क साधला व त्यांना २० जूनला लेखी पत्र देण्यात आले.उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांनी कसलीही चौकशी न करता किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी न घेता किंवा जिल्ह्यात हे काम करण्यासाठी इच्छुक संस्थांसाठी जाहिरात देऊन अर्ज न मागविता ज्या संस्थेने राठोड यांच्याशी संपर्क साधला त्याच संस्थेला संपूर्ण जिल्ह्यातील २६ जून रोजी देण्यात आले. सदर काम ग्रामपंचायतने कायद्यानुसार स्वत: करुन घ्यायचे आहे. पण जिल्ह्यातील एकाच संस्थेने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा स्थायी समितीत विषय मंजूरीला न ठेवणे, जाहिरात देऊन इतर संस्थांचे अर्ज न मागविणे व संस्थेने बिल्ले लावतांना ३० रुपयांऐवजी ५० रुपये घेणे यात मोठा घोटाळा झाला असल्याचे निदर्शनास येत असल्याचा परशुरामकर यांनी आरोप केला आहे.विभागीय आयुक्तांकडे तक्रारयांनी २६ जून रोजी सर्व खंडविकास अधिकाऱ्यांच्या नावाने पत्र काढले. सदर पत्र पंचायत समितीला प्राप्त होताच खंडविकास अधिकाºयांनी कोणतीही चौकशी न करता ग्रामसेवक व सरपंचांना निगर्मित केले. या पत्राचा आधार घेत या संस्थेने सर्व जिल्ह्यात हा गोरखधंदा सुरु करुन लाखो रुपयांची अवैध वसुली सुरु केली. यात राठोड यांचे हात बरबटले असल्याची सर्वत्र चर्चा असल्याने त्यांचा तातडीने प्रभार काढावा व चौकशी करावी, अशी मागणी परशुरामकर यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे.