शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
2
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
3
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
4
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
5
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
6
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
7
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
8
"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ
9
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
10
कर्ज वेळेपूर्वी फेडताय? थांबा, क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
11
ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर
12
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
13
IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी
14
दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?
15
NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
16
Katie Archibald: रुग्णांची सेवा करण्यासाठी स्पोर्ट्स करिअरवर सोडलं पाणी; स्टार खेळाडूची जगभरात चर्चा!
17
कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
18
Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!
19
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
20
पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी महिलांचा पोलिसांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2016 01:14 IST

जामनेर : गावात दारूबंदी व्हावी यासाठी महिलांनी मोर्चा काढला़ अधिका:यांना वारंवार याबाबत सूचना आणि तक्रारी केल्या़

जामनेर : गावात दारूबंदी व्हावी यासाठी महिलांनी मोर्चा काढला़ अधिका:यांना वारंवार याबाबत सूचना आणि तक्रारी केल्या़ मात्र अद्याप दारूबंदी झालीच नाही़ यामागचे काय कारण? दारूबंदी का होत नाही, असा सवाल तालुक्यातील गारखेडा येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या पोलीस निरीक्षक नजीर शेख यांना करीत महिलांनी घेराव घातला़

आणि गावात दारूबंदी करावी, अशी मागणी केली़ सोमवारी ही घटना घडली़ महिलांच्या या निवेदनाची दखल घेत पोलिसांनी तक्रारही दाखल करून घेतली़ आणि सायंकाळी चक्क अवैध दारूची विक्री करणा:या दोन जणांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतल़े परिसरातील अवैध दारू विक्रीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आह़े

यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात़ त्यासाठी संपूर्ण दारूबंदी करावी, या मागणीसाठी महिलांनी रूद्रावतार धारण केला. पोलीस निरीक्षक नजीर शेख आणि कर्मचा:यांना घेराव घातला़

महिलांची ही तक्रार लक्षात घेत, पोलीस प्रशासनाकडून सायंकाळी अवैध दारूची विक्री करणा:या दोन जणांवर कार्यवाही केली़ पोलीस उपनिरीक्षक वैशाली पवार, कोमलसिंग पाटील, आनंदसिंग पाटील, हरीश पवार, हंसराज वाघ यांनी ही कारवाई केली़ दारूची विक्री करणारे रमेश फकिरा तडवी आणि बाळू शालिग्राम यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दारूच्या 18 बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या़ दोन्ही आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव़़़

तालुक्यात अनेक गावांमध्ये महिलांकडून दारूबंदीची लेखी मागणी गेल्या सहा महिन्यांपासून होत आहे. पण दारूबंदीसाठी आवश्यक राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे दारूबंदी झालेली नाही़ (वार्ताहर)