शेतकऱ्यांना पालनासाठी दुधाळ गाय व कोंबडी मिळेल का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 05:00 IST2022-04-16T05:00:00+5:302022-04-16T05:00:06+5:30
शेतीसोबतच पशुपालक किंवा शेतकऱ्यांना जोड व्यवसाय करता यावा, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्हा व राज्य पातळीवर योजना राबविण्यात येतात. ४ डिसेंबरपासून या योजनांसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये राज्यस्तरीय योजनेत दुधाळ गाय म्हशी वाटप, शेळी मेंढी वाटप, कुक्कुटपालन यासह जिल्हा पातळीवरील योजनेत शेळी, मेंढी गट वाटप करणे, दुधाळू गायी, म्हशी वाटप करणे, एक दिवस सुधारीत पिल्लांचे वाटप करणे यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले.

शेतकऱ्यांना पालनासाठी दुधाळ गाय व कोंबडी मिळेल का ?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पशुपालकांना पशुसंवर्धन खात्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ देण्यात येतो. हा लाभ घेता यावा, यासाठी पशुसंवर्धन विभागांतर्गत जिल्हा व राज्यस्तरीय अशा दोन प्रकारात ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. घरी बसूनच मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे होते. पहिल्या टप्यात अर्जच आले नाही. मुदत वाढल्याने दुसऱ्या वेळी गोंदिया जिल्ह्यातून गाय-म्हैस, शेळी व कुक्कुट योजनेसाठी ३०३५ अर्ज आले आहेत.
या योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापेक्षाही जास्त प्रतिसाद मिळाला असता परंतु जिल्ह्यात आचारसंहिता असल्याने पशुसंवर्धन विभागाने अर्ज मागविण्यासाठी प्रसिध्दीच केली नाही. त्यामुळे जिल्ह्यात एकही अर्ज आला नाही. शेतीसोबतच पशुपालक किंवा शेतकऱ्यांना जोड व्यवसाय करता यावा, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्हा व राज्य पातळीवर योजना राबविण्यात येतात. ४ डिसेंबरपासून या योजनांसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये राज्यस्तरीय योजनेत दुधाळ गाय म्हशी वाटप, शेळी मेंढी वाटप, कुक्कुटपालन यासह जिल्हा पातळीवरील योजनेत शेळी, मेंढी गट वाटप करणे, दुधाळू गायी, म्हशी वाटप करणे, एक दिवस सुधारीत पिल्लांचे वाटप करणे यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या योजनेसाठी अर्जच मागविले नव्हते. परंतु मुदत वाढल्याने आता ३०३५ अर्ज आले आहेत, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले यांनी सांगितले.
ऑनलाईन अर्ज केले
- कोरोनाच्या काळात या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी एएच डॉट महाबीएमएस डॉट कॉम या संकेतस्थळावर, तसेच एएच महाबीएमएस या ॲपवर अर्ज करण्यात आले.
अर्ज ९०० जणांची निवड
- जिल्ह्यात ३०३५ अर्ज करण्यात आले. यातील ९०० जणांची निवड करण्यात आली आहे. ज्यांना लाभ मिळेल त्यांचे नाव कमी होईल. विभागाच्या संकेतस्थळावर, तसेच ॲपवर ऑनलाईन अर्ज करण्यात आले. ज्यांना यंदा लाभ मिळणार नाही त्यांच्या अर्जाचा विचार पुढील वर्षी प्रतीक्षा यादीनुसार होईल.
पशुसंवर्धन अधिकारी म्हणतात...
पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तयरीय विविध वैयक्तिक योजना राबविल्या जातात. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविले जातात. २०२१-२२ या वर्षासाठी जिल्ह्यात ३०३५ अर्ज आले आहेत.
- डॉ. कांतीलाल पटले,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी गोंदिया.