शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टरबाजांना आवरणार कोण ?

By admin | Updated: January 3, 2015 23:03 IST

अवैध जाहिरात फलक, होर्डिंग्समुळे गोंदिया शहराचे विद्रुपीकरण झाले आहे.अवैधपणे होर्डिंग्स लावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नगरपरिषदेतर्फे प्रयत्न केले जात असले तरी येथील नागरिकांकडून गोंदिया

पोस्टर, बॅनरने गोंदिया झाले विद्रुप : ग्रामपंचायतस्तरावर करच आकारत नाहीनरेश रहिले - गोंदियाअवैध जाहिरात फलक, होर्डिंग्समुळे गोंदिया शहराचे विद्रुपीकरण झाले आहे.अवैधपणे होर्डिंग्स लावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नगरपरिषदेतर्फे प्रयत्न केले जात असले तरी येथील नागरिकांकडून गोंदिया शहराचे विद्रुपीकरण करण्याचे प्रकार थांबत नाही. कुणी कुठेही बॅनर पोस्टर्स लावा असा प्रकार गोंदिया शहरात आजही सुरू आहे. या पोस्टरबाजांना आवर घालण्यात नगर परिषद प्रशासनही कमी पडत असल्याचे चित्र आहे. सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणाऱ्या जाहिराती, होर्डिंग्स तसेच इतर बाबीमुळे गावाचे व शहराचे विद्रुपीकरण होत असते. होर्डिंग्स लावणाऱ्या पक्षाचे कार्यकर्ते मोजक्या पोस्टरची परवानगी घेऊन भरमसाठ पोस्टर्स लावले जातात. नगरपरिषदेने होर्डींग्स लावण्याचे काही ठराविक ठिकाण ठरविले आहेत. मात्र होर्डींग्स लावणारे कार्यकर्ते जागा मिळेत तिथे होर्डिंग्स लावत असतात. शासकीय इमारती, महापुरूषांचे पुतळे, विद्युत खांब, उडाणपूल, शाळा, महाविद्यालय अशा विविध ठिकाणी बॅनर पोस्टर्स लावण्याचा सर्रास प्रकार गोंदिया शहरात सुरू आहे. गोंदिया शहरात कुठेही बॅनर, पोस्टर्स लावणाऱ्यांवर कारवाई केली जाते नाही. मात्र नगरपरिषद अवैध होर्डींग्स लावणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात असल्याचे सांगितले जाते. होर्डिंग्स लावणाऱ्यासाठी २ रुपये ५० पैसे प्रति स्केअर फूटच्या दराने होर्डिंग्सचे लावण्याचे कर आकारले जात आहे. लोकमतने वारंवार या संदर्भात वृत्त प्रकाशित करून काही महापुरूषांच्या प्रतिमेसमोर लावण्यात येणारे होर्डींग्स हटविण्यात आले. महापुरूषांच्या पुतळ्यांवर पोस्टर्स, बॅनरने अतिक्रमण करू नये यासाठी नागरिकांनी वारंवार पुतळ्यांसामोर होर्डिंग्स लावू नये असे सूचना फलकही लावण्यात आले आहेत. महापुरुषांच्या प्रतिमेलाही पोस्टर्सचा विळखाशहरात कुठेही बॅनर, पस्टर्स लावण्याची सवय गोंदियावासीयांना आहे. स्टेडियम परिसर, नेहरू चौक, जयस्तंभ चौक, मनोहर चौक, कुडवा नाका, कटंगी, शक्ती चौक, पाल चौक या परिसरत होर्डिंग्स लावता येईल परंतु या चौकात असलेल्या महापुरूषांच्या प्रतिमा किंवा शासकीय इमारतीवर हे होर्डिंग्स लावता येणार नाही, अशी अट नगर परिषदेने घातली आहे. मात्र, त्याचे पालन होताना दिसत नाही. शहरातील पुतळ्यांच्या सभोवताल पोस्टर लावण्याचे प्रकार वाढले आहेत.