शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

खरेदी केंद्रावर नियंत्रण कुणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 6:00 AM

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करुन धान खरेदी केली जाते. यासाठी फेडरेशन सेवा सहकारी संस्थाशी करार करुन त्यांना खरेदी केंद्र उघडण्याची परवानगी देते. यंदा शासनाने ६५ धान खरेदी केंद्राना मंजुरी दिली आहे. यासर्व खरेदी केंद्रावर मागील महिनाभरापासून धान खरेदी सुरू असून आतापर्यंत ३ लाख क्विंटलहून अधिक धान खरेदी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसंस्था चालकांची मनमानी : फेडरेशनकडे मनुष्यबळाचा अभाव, निधी आला पण वाटप करायचे कसे?

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या ६५ शासकीय धान खरेदी केंद्रावरुन सध्या खरीप हंगामातील शासकीय धान खरेदी केली जात आहे. हे केंद्र संस्थेच्या माध्यमातून चालविली जात असून त्यांच्या मनमानी धोरणामुळे शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याची ओरड आहे. मात्र या सर्व प्रकाराला चाप आणि नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. परिणामी सध्या शासकीय धान खरेदी केंद्रावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने मोकळे रान असल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करुन धान खरेदी केली जाते. यासाठी फेडरेशन सेवा सहकारी संस्थाशी करार करुन त्यांना खरेदी केंद्र उघडण्याची परवानगी देते. यंदा शासनाने ६५ धान खरेदी केंद्राना मंजुरी दिली आहे. यासर्व खरेदी केंद्रावर मागील महिनाभरापासून धान खरेदी सुरू असून आतापर्यंत ३ लाख क्विंटलहून अधिक धान खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिशाभूल आणि लूट होऊ नये,यासाठी प्रत्येक केंद्रावर फेडरेशनने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी असे निर्देश आहेत. यामुळे सेवा सहकारी संस्थावर सुध्दा वचक राहतो. मात्र फेडरेशनकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने संस्थाच्या भरोश्यावरच धान खरेदी सुरू आहे.त्यामुळे काही केंद्रावर संस्था चालकांची मनमाई सुरू असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. शेतकºयांनी याची जिल्हाधिकारी आणि फेडरेशनकडे तक्रार केली. केंद्रावर आवश्यक त्या सुविधा सुध्दा उपलब्ध करुन दिल्या जात नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ६५ धान खरेदी केंद्रावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मात्र अद्यापही मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले नाही. त्यामुळे खरेदी केंद्राची तपासणी करण्यासाठी कर्मचारीच नसल्याने नियंत्रण ठेवण्यास अडचण जात असल्याचे सांगितले.जिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेश कागदावरचशासकीय धान खरेदी केंद्रावर कुठलाही गैरप्रकार होऊ नये,यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी फेडरेशनला भरारी पथक तयार करण्याचे निर्देश दिले होते. नियमांचे उल्लघंन आणि शेतकºयांची दिशाभूल करणाऱ्या संस्था चालकांवर कारवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र फेडरेशनकडे कर्मचारीच नसल्याने पथक तयार करायचे कसे आणि केंद्रावर कर्मचाºयांची नियुक्ती करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे जिल्हाधिकाºयांचे आदेश अजुनही कागदावरच असल्याचे चित्र आहे.चुकारे वाटप करण्याची अडचणजिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ५३ कोटी रुपयांचे चुकारे देणे बाकी होते. नुकताच यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी फेडरेशनला प्राप्त झाला.मात्र चुकारे वाटप करण्यासाठी कर्मचारी नसल्याने यातही अनेक अडचणी येत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड