शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

गोंदियातला भरडाई केलेला लाखो क्विंटल तांदूळ ठेवायचा कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 1:50 PM

मागील आठ ते दहा वर्षांच्या कालावधीत प्रथमच जिल्ह्यातील शासकीय गोदामे तांदळाने हाऊसफुल झाली आहेत. त्यामुळे नवीन भरडाई केलेला तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न आता गोंदिया जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील गोदाम झाले हाऊसफुल नवीन तांदूळ ठेवण्याची समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील आठ ते दहा वर्षांच्या कालावधीत प्रथमच जिल्ह्यातील शासकीय गोदामे तांदळाने हाऊसफुल झाली आहेत. त्यामुळे नवीन भरडाई केलेला तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न आता जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. गोदामातील तांदळाची उचल करण्यासंदर्भात अद्याप शासनाने कुठलेच नियोजन केले नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.गोंदिया जिल्ह्यात राईसमिलची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गोंदिया-भंडारा या दोन जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत दोन्ही जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून हमीभावानुसार शेतकऱ्यांकडून धान खरेदी केली जाते. त्यानंतर खरेदी केलेला धान भरडाई करण्यासाठी राईसमिल धारकांना निविदा काढून दिला जातो. राईसमिल धारक धानाची भरडाई करुन तांदूळ जमा करतात.त्यानंतर या तांदळाचा जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केला जातो. जिल्ह्यात दरवर्षी १३ ते १४ लाख क्विंटल तादंूळ जमा केला जातो. तर यापैकी जिल्ह्यात केवळ ४ लाख क्विंटल तांदळाची मागणी आहे. त्यामुळे जवळपास १० लाख क्विंटल तांदूळ शासकीय गोदामांमध्ये शिल्लक राहतो. शिल्लक असलेला तांदूळ पुरवठा विभागाकडूृन नियोजन करुन इतर जिल्ह्यात पाठविला जातो. दरवर्षी जिल्ह्याबाहेर तांदूळ पाठविण्याचे नियोजन विभागीय आयुक्त कार्यालयाकडून केले जात होते. मात्र यावर्षीपासून विभागीय आयुक्त कार्यालयाचे नियोजनाचे अधिकार काढून घेण्यात आले आहे. आता हे अधिकार अन्न व पुरवठा मंत्रालयाकडे आहेत. मात्र या विभागाकडून अद्यापही कुठलेही नियोजन करण्यात आले नाही. शिवाय त्यासंदर्भातील कुठलेच आदेश जिल्हा पुरवठा विभागाला देण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ शिल्लक आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील गोदामांमध्ये २५ हजार मॅट्रीक टन आणि भारतीय खाद्य मंडळाकडे ३५०० मॅट्रीक टन तांदूळ शिल्लक आहे. तर सन २०१८ मध्ये जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने राईसमिल धारकांना भरडाईसाठी दिलेल्या ५० हजार क्विंटल तांदूळ ३० जूनपर्यंत येणार आहे. त्यामुळे आधीच गोदामात शिल्लक असलेल्या तांदळाची उचल झाली नसल्याने नवीन भरडाई करुन येणारा ५० हजार क्विंटल तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न या दोन्ही विभागांपुढे निर्माण झाला आहे.

तर धानाची भरडाई थांबणारगोदामांमध्ये शिल्लक असलेल्या तांदळाची उचल करुन गोदाम खाली न केल्यास नवीन तांदूळ ठेवण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. हा तांदूळ तसाच पडून राहिला तर तांदूळ खराब होवू शकतो. राईसमिल धारकांकडे पूर्वीचाच तांदूळ शिल्लक आहे. त्याच तांदळाची उचल झाली नसल्याने उर्वरित धानाची भरडाई थांबवावी लागणार आहे. मात्र यावर अद्यापही शासनाने कुठलाच निर्णय घेतला नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

कुठे किती तांदूळ शिल्लकजिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत दरवर्षी १६ लाख क्विंटल धानाची खरेदी केली जाते. त्यानंतर हे धान भरडाई करण्यासाठी १२५ राईस मिल धारकांकडे पाठविला जातात. राईसमिलधारक धानाची भरडाई करुन तांदूळ तयार करतात. १ क्विंटल धानापासून जवळपास ६७ क्विंटल तांदूळ तयार होते. सध्या स्थितीत गोंदिया येथील गोदामात १० हजार २५० मॅट्रीक टन, आमगाव ६ हजार मॅट्रीक टन, गोरेगाव १ हजार, सौंदड ५००, देवरी १ हजार, नवेगावबांध १ हजार, अर्जुनी मोरगाव येथील गोदामात ५ हजार मॅट्रीक टन तांदूळ शिल्लक आहे. या गोदामांची जेवढी क्षमता आहे. तेवढा तांदूळ गोदामांमध्ये भरला आहे. त्यामुळे नवीन येणार तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याचे पद रिक्तगोंदिया येथील जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांची दोन महिन्यापूर्वी बदली झाली. त्यांच्या जागेवर अद्यापही शासनाने दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली नाही. त्यामुळे सुध्दा अडचण निर्माण होत आहे.

अधिकार कपात व नियोजनाचा फटकाभरडाई केलेला तांदूळ जिल्ह्याबाहेर पाठविण्यासाठी पूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून नियोजन केले जात होते. मात्र यावर्षीपासून शासनाने त्यांचे अधिकार कपात केले. त्यामुळेच भरडाई केलेला लाखो क्विंटल तांदूळ गोदामांमध्ये तसाच पडून आहे. यासंदर्भात या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता शासनाकडून अद्यापही कुठलेच नियोजन झाले नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले.

टॅग्स :agricultureशेती