शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सावकारांवर कारवाई कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2016 02:00 IST

कर्जदारांना कच्चा पावत्या देऊन लाखो रुपयांचे सोने सावकारांनी गहाण ठेवून घेतल्याच्या तक्रारी येत आहेत.

उपोषणाचा इशारा : अनेक कर्जदार शेतकरी संकटात अर्जुनी-मोरगाव : कर्जदारांना कच्चा पावत्या देऊन लाखो रुपयांचे सोने सावकारांनी गहाण ठेवून घेतल्याच्या तक्रारी येत आहेत. सावकार कर्जदारांना सोने परत करीत नसल्याने अनेक कर्जदार शासनाच्या योजनेपासून वंचित आहेत. याविरूध्द वडेगाव-स्टेशन येथील विजय मारोती खुणे यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. सावकारांनी सोन्याच्या मोबदल्यात दिलेल्या कर्जाला शासनाने १० एप्रिल रोजी कर्जमाफी योजना जाहीर केली. यासाठी ३० नोव्हेंबर २०१४ अखेरपर्यंत थकीत असलेले कर्जदार पात्र आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ५९४ कर्जदारांचे ५८ लाख ९० हजार ७३४ रुपयांचे सोने सावकारांकडून कर्जदारांना परत करण्यात आले. ४६७ कर्जदारांच्या ३१ लाख ४६ हजार ७०७ रुपयांच्या दाव्यांना २८ डिसेंबर रोजी मंजूरी देण्यात आली. यातील कर्जदारांना सोने परत करण्याची सावकारांकडून प्रक्रिया सुरू आहे. मात्र याव्यतिरीक्त २५४ दावे अपात्र ठरविण्यात आले आहेत. तालुकास्तरीय समितीकडून १४ जानेवारी रोजी १६६ दावे पात्र व ६३ दावे अपात्र ठरवून मंजूरीसाठी जिल्हा समितीकडे पाठविण्यात आले. याचे मूल्य १० लक्ष ९२ हजार ७०० रुपये एवढे आहे. तालुक्यात परवाना प्राप्त सावकारांची संख्या २४ आहे. काही परवानाधारक सावकारांनी साध्या चिढ्ढीवर सोने तारण ठेवून त्या चिढ्या कर्जदारांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे या चिट्यांत नमूद सोनेतारणची नोंद त्यांच्या रोकडपुस्तिकेत नाही. अनेकांनी तर तारण करून कर्जदाराला दिलेल्या चिट्टीवर स्वाक्षरी सुध्दा केलेली नाही. परवानाप्राप्त सावकारांचे पावती बुक व रोकड पुस्तिकेची सहकार विभागाकडून दरवर्षी हिशेब तपासणी केली जाते. शासनाने सावकार कर्जमाफी योजना जाहीर करताच कर्जदार सावकाराकडे दावा दाखल करण्यासाठी जातात. सावकारांनी अशा नोंदी घेतल्या नसल्याने शासनाकडून कर्जमाफी होणार नाही असे सोनेतारण आपल्याच मानगुटीवर बसेल म्हणून कर्जदारांना परत करण्यास चक्क नकार देतात. मुद्दल कर्जाची राशी द्या, व्याज माफी करतो असे सावकार सांगत असल्याचे कर्जदार सांगतात. अजूनही बरेच कर्जदार या योजनेपासून वंचित आहेत. सावकारांच्या छळाविरूध्द विजय खुणे यांनी २८ जानेवारी रोजी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात कर्जदारांसमवेत तक्रार नोंदविली. यात तालुक्यात विना परवानाधारक सावकार काम करीत आहेत. एकाच परवान्यावर अनेक सावकार व्यवसाय करतात अशा बोगस सावकारांवर व संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई मागणी केली आहे. अन्यथा ९ फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)