आता लग्नाचे वऱ्हाड रेल्वेने !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 05:00 IST2021-12-27T05:00:00+5:302021-12-27T05:00:02+5:30
लग्नाची वरात नेण्यासाठी वधू वराच्या पालकांकडून एसटी बुक केली जात होती. पण त्यांना सुध्दा आता खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. रेल्वेने पूर्ण गाडी अथवा काही डब्बे बुक करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. लग्नाचे वऱ्हाड नेण्यासाठी तुम्हाला रेल्वेचा डब्बा बुक करायचा असल्यास तो आता करणे अगदी सोपे झाले आहे.

आता लग्नाचे वऱ्हाड रेल्वेने !
अंकुश गुंडावार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील दोन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यामुळे प्रवाशांना सुध्दा याचा फटका बसत आहे. तर लग्नाची वरात नेण्यासाठी वधू वराच्या पालकांकडून एसटी बुक केली जात होती. पण त्यांना सुध्दा आता खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. रेल्वेने पूर्ण गाडी अथवा काही डब्बे बुक करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. लग्नाचे वऱ्हाड नेण्यासाठी तुम्हाला रेल्वेचा डब्बा बुक करायचा असल्यास तो आता करणे अगदी सोपे झाले आहे.
एका डब्यासाठी ७० ते ८० हजार रुपये
- रेल्वेचा एक डब्बा बूक करण्याचे दर हे अंतरावरुन ठरतात साधारणपणे गोंदिया ते पुणे या अंतरासाठी रेल्वेचा एक डबा बुक करतो म्हटल्यास त्यासाठी जवळपास ७० ते ८० हजार रुपये लागतात. पण हे दर प्रामुख्याने अंतरावरुन ठरतात.
एका रेल्वे स्थानकावर ७ मिनिटे थांबणार
- रे्ल्वेचा डब्बा अथवा संपूर्ण रेल्वे बुक केल्यास ही गाडी एका रेल्वे स्थानकावर ७ मिनिटांच्या वर थांबणार असे नियोजन रेल्वे विभागाकडून कडून केले जाते. तर संपूर्ण रेल्वे बूक केल्यास ती गाडी केवळ काही विशिष्ट स्थानकावरच थांबविली जाते. अथवा ती तिच्या नियोजित ठिकाणीच थांबते.
५२ हजार ५०० रुपये एका डब्यासाठी
- रेल्वेचा संपूर्ण एक डबा बुक करण्यासाठी ५२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम म्हणून आधी जमा करावी लागते. नंतर काही दिवसांनी ही रक्कम परत केली जाते. केवळ सुरक्षा ठेव म्हणून ही रक्कम घेतली जाते.
लाखात करा संपूर्ण रेल्वे गाडी बुक
- लग्न कार्य अथवा इतर कुठल्या कार्यक्रमासाठी रेल्वे गाडी बूक करता येते. यासाठीचे दर अंतरावरुन निश्चित केले जातात. गोंदिया ते पुणे या अंतरासाठी संपूर्ण रेल्वे गाडी बुक करण्यासाठी जवळपास २० लाख रुपयांचा खर्च येतो. जेवढे अंतर कमी तेवढे दर कमी होतात.
रेल्वेने वऱ्हाड, असे करा बुक
- रेल्वेचा डब्बा अथवा संपूर्ण गाडी बुक करायची असल्यास रेल्वे स्थानकावरील बुकींग ऑफीस अथवा आयआरसीटीसीच्या ऑनलाईन संकेतस्थळावर जावे. यासाठी रेल्वेने काही रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवणे अनिवार्य केले आहे.