शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

आटत आहेत जिल्ह्यातील जलस्रोत

By admin | Updated: February 12, 2015 01:20 IST

या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यातील पाण्याचे विविध स्त्रोत आटत चालले आहेत. त्यामुळे यंदा पाण्याच्या समस्येत मोठी वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

गोंदिया : या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यातील पाण्याचे विविध स्त्रोत आटत चालले आहेत. त्यामुळे यंदा पाण्याच्या समस्येत मोठी वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.जिल्ह्यात चार प्रमुख जलाशय आहेत. यापैकी एक कालीसरार मागील तीन महिन्यांपूर्वीच पूर्णत: आटले आहे. सध्या इटियाडोहमध्ये ५९.९० टक्के, सिरपूरमध्ये ४५.३२ टक्के व पूजारीटोला जलाशयात २१.३८ टक्के पाणी उरले आहे. इटियाडोह व पूजारीटोला जलाशयातून सिंचनासाठी पाणी दिले जात आहे. त्यामुळे सदर दोन्ही तलाव तीव्रतेने रिक्त होत आहेत.मध्यम प्रकल्पाच्या १० पैकी सहा तलाव, लघु प्रकल्पाच्या १९ पैकी सहा व मालगुजारीच्या ३८ पैकी १९ तलावांत केवळ १० टक्के पाणी उरले आहे. यापैकी १२ ठिकाणी पाण्याचे स्त्रोत लघुत्तम स्थितीत आहेत. याशिवाय चार ठिकाणांवर एक टक्के, पाच ठिकाणी दोन टक्क्यांपेक्षा कमी पाणी उरले आहे.मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जलाशय व तलावांत पाणी खूपच कमी उरले आहे. जिल्ह्यात पाण्याची किती मोठी समस्या उद्भवू शकते, याबाबत अंदाज लावले जावू शकते. ज्या कालीसरार जलाशयात तीन महिन्यापूर्वीच पाणी आटले, तेथे आजच्या स्थितीत मागील वर्षी ४१.७६ टक्के पाणी होते. इटियाडोहात ७२.४५, सिरपूरमध्ये ९१.१७ व पूजारीटोला जलाशयात ४०.११ टक्के पाणी मागील वर्षी आजच्या स्थितीत बाकी होते.मध्यम प्रकल्पाच्या संग्रामपूर, लघु प्रकल्पाच्या वडेगाव, जुन्या मालगुजारी तलावांतून भानपूर, बोपाबोडी, भिवखिडकी, चान्ना बाक्टी, चिरचाडी, धाबेटेकडी, कोसबीबाकी, पालडोंगरी, तेढा, ताडगाव तलाव पाण्याच्या अत्यंत पातळीवर आलेले आहेत. स्थानिक स्तरावरील छत्तरटोला, सालेगाव व चारभाटा तलावसुद्धा पाण्याच्या लघुत्तम पातळीच्या खाली पोहचले आहेत. हीच स्थिती राहिल्यास उन्हाळ््यात पाणी पेटणार यात शंका नाही. (प्रतिनिधी)पाऊल ठरेल लाभदायकबुधवार (दि.११) सकाळी ६ वाजता जिल्ह्यात पाऊस आला. हा पाऊस उन्हाळी धानपिकांची रोवणी झालेल्या रोपट्यांना लाभदायक ठरेल. तसेच या पावसाचा रबीच्या पिकांनासुद्धा फायदा होईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी ए.एस. भोंगाडे यांनी सांगितले आहे. तलावांतील पाण्याची तुलना (यावर्षी व मागील वर्षी)मध्यम प्रकल्पाच्या तलावांतील बोदलकसा येथे ६.८१ (३८.७९), चोरखमारा ०.९३ (४६.७५), चुलबंध ८.४८ (६२.२०), खळबंदा ९.९२ (६३.६१), रेंगेपार १.९९ (५४.९५), लघु प्रकल्पाच्या गुमडोह २.३० (२६.२१), हरी ०.८५ (५५.४६), पांगडी १.४६ (२६.६९), रिसाला १.४२ (२२.५६), सडेपार १.६४ (५४.८४), जुन्या मालगुजारी तलावांच्या फुलचूर ७.९१ (८२.०१), खैरी ३.६५ (४१.६१), ककोडी ९.५५ (९.५५), काटी १.३५ (१२.७४), खोडशिवणी ८.२२ (५०.१०), खाडीपार ५.६६ (१९.५०), मुंडीपार ०.९२ (४.५९), मेंढा ९.६६ (३४.६६) नांदलपार १२.९२ (५७.७५), पळसगाव डव्वा २.०१ (२१.८३) पाणी आहे. कंसात दिलेले अंक मागील वर्षी असलेल्या पाण्याची आजची स्थिती तर कंसाबाहेरचे अंक यावर्षीची आजची स्थिती दर्शवितात.