शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांकडून जमावबंदी आदेशाचे उल्लघंन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी व परिसरात खाजगी कंत्राददारांकडून घर बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभुमीवर कलम १४४ लागू करुन ५ पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी येणार नाही असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. असे असताना सुद्धा खाजगी कंत्राटदारांकडून घर बांधकामासाठी ५-१० मजूर लावून कामे करीत आहेत.

ठळक मुद्देघर बांधकाम सुरूच : बांधकाम थांबविण्याची नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेवून संपूर्ण राज्यात जमावबंदी असताना खाजगी कंत्राटदारांकडून घरे बांधून देण्याचा सपाटा सुरुच आहे. एक घर बांधून देण्यासाठी सुमारे ५-१० मजूर कामावर लावून बांधकाम सुरू असल्याने त्यांच्याकडून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लघंन होताना दिसत आहे. यावर प्रशासनाने वेळीच दखल घेवून बांधकाम थांबवावे अशी मागणी केली जात आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी व परिसरात खाजगी कंत्राददारांकडून घर बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभुमीवर कलम १४४ लागू करुन ५ पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी येणार नाही असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. असे असताना सुद्धा खाजगी कंत्राटदारांकडून घर बांधकामासाठी ५-१० मजूर लावून कामे करीत आहेत.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षीत उपाय म्हणून चारचाकी, दुचाकींच्या प्रवासावर देखील बंदी घालण्यात आली आहे. अशात बांधकाम करणाºया कंत्राटदारांच्या कामावर बंदी का नसावी असा प्रश्न निर्माण होत आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने दखल घेवून खाजगी कंत्राटदारांकडून सुरु असलेले बांधकाम थांबविण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या