The villagers read the problems | गावकऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा

गावकऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा

ठळक मुद्देमूलभूत सुविधा कधी मिळणार । जि.प.सदस्यांनी दिली भेट

न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यातील पिपरीया जिल्हा परिषद क्षेत्राच्या जि.प.सदस्या दुर्गा तिराले यांनी महाराष्टÑ आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील अतिदुर्गम भागातील गावांना भेट देऊन तेथील गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आदिवासी बांधवानी आपल्या व्यथा मांडीत विविध समस्यांचा पाढा तिराले यांच्यासमोर वाचला. समस्या दूर करण्याची मागणी केली.
या वेळी कोसमतर्राचे सरपंच कैलास धामडे, सामाजिक कार्यकर्ते गोपाल तिराले, सुखीराम कोर्राम, जीवनलाल कोर्राम यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते.
नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असलेले नागरिक वर्षानुवर्षे आपल्या मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याने ते समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेले नाही. शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचल्या नसल्याने त्यांचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. जि.प.सदस्य तिराले यांनी दल्लाटोला, कोपालगड, आमाटोला या गावांना भेट दिली. दल्लाटोला, कोपालगड येथे गावकऱ्यांची सभा घेतली तेव्हा दल्लाटोला येथील लोकांनी सांगितले की त्यांच्या गावात एक तलाव आहे. त्या तलावाच्या पाण्यातून गावकरी आपली गरज भागवितात. तलावाचे गेट नादुरुस्त असल्याने तलावाचा पाण्याचा अपव्यय होतो. त्याचा गावकºयांना कसलाच उपयोग होत नाही. परिणामी गावकऱ्यांना दरवर्षी पाणी टंचाईला समोरे जावे लागते. गावातील अनेक कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. परिणामी अनेक कुटुंबांना उघड्यावर राहावे लागत आहे. गावात अद्यापही विद्युत पथदिवे लावण्यात आले नाही. तर पक्के रस्ते नसल्याने गावकऱ्यांना पावसाळ्यात विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. या भागातील वीज पुरवठा नेहमीच खंडित असतो. त्यामुळे या भागात २४ वीज पुरवठा करण्याची मागणी केली. तिराले यांनी गावकºयांच्या समस्या ऐकून घेत त्या सोडविण्याची ग्वाही दिली.

Web Title: The villagers read the problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.