शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
3
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
4
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
5
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
6
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
7
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
8
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
9
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
10
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
11
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
12
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
13
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
14
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
15
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
16
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
17
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
18
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
19
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
20
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात अवघ्या ८.५ टक्के पेरण्या

By admin | Updated: July 5, 2014 23:39 IST

मृगात बरसलेल्या पावसाने गेल्या १५ दिवसांपासून दांडी मारल्याने विदर्भातील ११ जिल्ह्यात खरीपातील पिकं संकटात सापडली आहेत. नागपूर विभागात अवघ्या ८ टक्के तर अमरावती विभागात जेमतेम

रोपं करपताहेत : सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प
गोंदिया : मृगात बरसलेल्या पावसाने गेल्या १५ दिवसांपासून दांडी मारल्याने विदर्भातील ११ जिल्ह्यात खरीपातील पिकं संकटात सापडली आहेत. नागपूर विभागात अवघ्या ८ टक्के तर अमरावती विभागात जेमतेम ९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. आणखी दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही तर अंकुरलेली रोपे पूर्णपणे करपली जाऊन ती वाचविणे कठीण होणार आहे.
पश्चिम विदर्भात कापूस व सोयाबीन हे खरीपातील मुख्य पिक आहे तर पूर्व विदर्भात धानाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. कापूस पट्ट्यात कमी पाण्यातही लागवड होत असल्यामुळे लागवडीचे प्रमाण जास्त आहे. मात्र पूर्व विदर्भात पावसाशिवाय धानाच्या आवत्या टाकणे किंवा पऱ्हे लावणी शक्य नाही. त्यामुळे गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात अवघी एक टक्के लावणी झाली आहे.
नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात एकूण १८ लाख ३६ लाख ६०० हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी ३० जूनपर्यंत १ लाख ३९ हजार ८०० हेक्टरवर पिकांची लागवड झाली आहे. तर पश्चिम विदर्भात अर्थात अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामाचे लागवड क्षेत्र ३२ लाख ८२ हजार ३०० हेक्टर आहे.
आतापर्यंत त्यापैकी २ लाख ८२ हजार ३०० हेक्टरवर लागवड झाली आहे. गेल्यावर्षी अमरावती विभागात ३० जूनपर्यंत ६४ टक्के पेरणी झाली होती. मात्र यावर्षी हे प्रमाण अवघे ९ टक्के आहे.
जून महिन्यात अमरावती विभागात सरासरी १५२.५ मिमी पाऊस होतो. परंतू यावर्षी जून अखेर पडलेल्या पावसाची सरासरी केवळ ४१.०० मिमी आहे. पाऊस लांबल्यामुळे कमी कालावधीत निघणाऱ्या मूग, उडीद या पिकांवर संक्रांत येणार आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)