शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टॉलेशन अभावी व्हेंटिलेटर धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:01 IST

ऑक्सिजन अभावी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने कुठलाच धडा घेतला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तर आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार दररोज पुढे येत आहे. कोरोना संसर्गाच्या काळात व्हेंटिलेटरअभावी रूग्णांची गैरसोय व जीव धोक्यात येऊ नये यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २० लाख रु पयांची तरतूद व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी करण्यात आली.

ठळक मुद्देमहिनाभरापासून कनेक्टरचा अभाव : मेडिकलचा अजब कारभार, २० लाखांतून खरेदी केलेले १२ व्हेंटिलेटर पडून

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील ५ महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. अशा स्थितीत व्हेंटिलेटरचा तुटवडा जावू नये यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या २० लाख रूपयांच्या निधीतून १२ व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले. मात्र मागील महिनाभरापासून इन्स्टॉलेशन अभावी व्हेंटिलेटर तसेच धूळखात पडून असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.ऑक्सिजन अभावी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने कुठलाच धडा घेतला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तर आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार दररोज पुढे येत आहे. कोरोना संसर्गाच्या काळात व्हेंटिलेटरअभावी रूग्णांची गैरसोय व जीव धोक्यात येऊ नये यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २० लाख रु पयांची तरतूद व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी करण्यात आली. यानंतर मेडिकलने एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून महिनाभरापूर्वी १२ व्हेंटिलेटरची खरेदी केली. हे व्हेंटिलेटर इन्स्टॉलेशन करण्यासाठी संबंधित कंपनीचे टेक्नीशियन आले होते. मात्र काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. तसेच व्हेंटिलेटर कनेक्ट करण्यासाठी कनेक्टर नसल्याने मागील महिनाभरापासून १२ व्हेंटिलेटर तसेच धूळखात पडले आहेत.विशेष म्हणजे, सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अशात व्हेंटिलेटरची केव्हाही गरज पडू शकते. यामुळे त्या दृष्टिकोनातून मेडिकलने यावर वेळीच उपाययोजना करून व्हेंटिलेटर कनेक्ट करून इन्स्टॉलेशन करण्याची गरज होती. मात्र तसे न केल्याने हे व्हेंटिलेटर तसेच पडून आहे. जिल्हा प्रशासनाने गरज ओळखून निधी उपलब्ध करून दिला. मात्र मेडिकलच्या वेळकाढू धोरणामुळे या व्हेंटिलेटरचा कसलाच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, राज्यात काही ठिकाणी व्हेंटिलेटरचा तुटवडा निर्माण झाला आहे व अडचण निर्माण होत आहे. तर गोंदिया जिल्ह्यात मात्र उलटे चित्र आहे. या प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाचे सुद्धा दुर्लक्ष झाले आहे. जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करु न दिल्यानंतर त्याचा योग्य उपयोग झाला की नाही याची सुद्धा चाचपणी केली नाही.

जिल्हा नियोजन समितीतून प्राप्त २० लाख रु पयांच्या निधीतून १२ व्हेंटिलेटर एका खासगी कंपनीकडून खरेदी करण्यात आले. मात्र कनेक्टर अभावी त्यांचे इन्स्टॉलेशन अद्याप झालेले नाही. जेव्हा पर्यंत इन्स्टॉलेशन पूर्ण होणार नाही तेव्हा पर्यंत त्या कंपनीला बिल देण्यात येणार नाही. लवकरात लवकर व्हेंटिलेटरचे इन्स्टॉलेशन करण्याचे निर्देश या कंपनीला दिले आहे.- व्ही.पी.रु खमोडेअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदियामाहिती लपविण्याचा प्रकार सुरु चमागील काही दिवसांपासून क्वारंटाईन आणि कोविड केअर सेंटरमधील अनागोंदी कारभार पुढे येत आहे. तर आरोग्य विभागाकडून आपल्या अनागोंदी कारभाराची पोलखोल होवू नये यासाठी कोरोना बाधित आणि मृतांची माहिती लपविली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल