शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज विविध कार्यक्रम

By admin | Updated: May 21, 2016 01:46 IST

तथागत भगवान बुद्धांचा जन्म, बुद्धत्व प्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही महत्त्वपूर्ण घटना एकाच दिवशी वैशाख पौर्णिमेला घडल्या.

गोंदिया : तथागत भगवान बुद्धांचा जन्म, बुद्धत्व प्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही महत्त्वपूर्ण घटना एकाच दिवशी वैशाख पौर्णिमेला घडल्या. त्यामुळे या त्रिवार पवित्र दिवसानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सत्यशोधक विचार मंचतिरोडा : सत्यशोधक विचार मंच जुनी वस्तीच्या वतीने जगजीवन वार्डात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शनिवार (दि.२१) सकाळी ७ वाजता बुद्ध वंदना घेण्यात येईल. त्यानंतर शांती मार्च काढण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता प्रा. भास्कर गायकवाड यांचे संगीतमय प्रबोधन ‘भीयायन’ होईल. रविवार (दि.२२) सकाळी ९.३० ते १०.३० वाजता ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथावर स्पर्धा परीक्षा, सायंकाळी ६.३० वाजता भंते यश (नागपूर) व प्रा. सविता बेदरकर (गोंदिया) यांचे मार्गदर्शनपर भाषणे होती. सदर कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सत्यशोधक विचार मंचातर्फे करण्यात आले आहे. महाप्रज्ञा बुद्ध विहारतिरोडा : येथील महाप्रज्ञा बुद्ध विहारात सकाळी ८ वाजता बुद्ध वंदना व ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध उपासक व उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विहार समितीचे अध्यक्ष अतुल गजभिये यांनी केले आहे. तक्षशिला बुद्ध विहारतिरोडा : तथागत भगवान बुद्धांची जयंती, बुद्धत्व प्राप्ती व महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी तक्षशिला बुद्ध विहारात बुद्ध वंदनेचे आयोजन करण्यात आले आहे. यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विहार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. नालंदा बुद्ध विहार,चिरेखनीतिरोडा : चिरेखनी येथील नालंदा बुद्ध विहारात बुद्ध जयंती कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. बुद्ध वंदना व मान्यवरांचे मार्गदर्शन होईल. कार्यक्रमास ग्रामस्थ महिला-पुरूषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नवयुवक बौद्ध समितीच्या वतीने करण्यात आले आहे.बौद्ध महासभा शाखा, भजेपारतिरोडा : भजेपार येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा शाखा भजेपारच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते, जि.प. सदस्य रजनी कुंभरे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. सकाळी ८ वाजता परित्राण पाठ, पंचशील ध्वज वंदना व सामूहिक बुद्ध वंदना; सायंकाळी ६ वाजता सामूहिक बुद्ध वंदना व अतिथींचे मार्गदर्शन, सायंकाळी ७ वाजता स्मृतिशेष सत्यभामा बळीराम वासनिक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भोजनदान करण्यात येईल. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जैराम वासनिक, पवन वासनिक व आयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)