शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णोदेवीचे दर्शन राहिले अपुरे

By admin | Updated: November 8, 2014 01:25 IST

गोंदिया येथून विशेष रेल्वेगाडीने वैष्णोदेवीची यात्रा करायला जाण्यासाठी स्थानिक रेल्वे स्थानकावर हजारो यात्रेकरू गोळा झाले.

गोंदिया : गोंदिया येथून विशेष रेल्वेगाडीने वैष्णोदेवीची यात्रा करायला जाण्यासाठी स्थानिक रेल्वे स्थानकावर हजारो यात्रेकरू गोळा झाले. गुरूवारच्या रात्री या भाविकांसाठी एक विशेष गाडी आली. मात्र या गाडीत भोजनयान डबा नसल्यामुळे यात्रेकरूंनी रेल्वेस्थानकावर गोंधळ घातला. रेल्वे विभागाच्या विरोधात असंतोष व्यक्त करीत यात्रा न करताच यात्रेकरूंना घरी परतावे लागले.रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे यात्रेकरूंना नाहक त्रास झाला. यात्रेचे आयोजन श्री गंज वॉर्ड मा वैष्णोदेवी सेवा समिती करते. या प्रकारामुळे या आयोजन समितीला मोठे नुकसान सहन करावे लागले. याचा फटका रेल्वे विभागालाही बसणार आहे.विशेष म्हणजे श्री गंजवार्ड मॉ वैष्णोदेवी सेवा समिती मागील अनेक वर्षापासून कमी तिकीटमध्ये वैष्णोदेवी दर्शनासाठी विशेष गाडीची सोय करते. या वर्र्षी ६ ते १२ नोव्हेंबर दरम्यान १८ बोगी असलेल्या एका विशेष गाडीचे आयोजन करण्यात आले होते. महिनाभरापूर्वी यासाठी बुकिंग करण्यात आली होती. यासाठी ६९ लाख रूपये रेल्वे विभागाला देण्यात आले. रेल्वेने ६ नोव्हेंबरला एक विशेष रेल्वेगाडी गोंदिया रेल्वे स्टेशनवर पाठविली. परंतु यात्रेकरू रात्री रेल्वे स्थानकाच्या प्लेटफार्म नंबर ५ वर पोहचले. त्यांनी त्या गाडीची पाहणी केल्यावर त्या गाडीत भोजनयान नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. भोजनयानच्या ठिकाणी वातानुकूलित ओवन पेन्ट्रीकार लावण्यात आली होती. त्या कक्षात फक्त भोजन को गरम व ताजे ठेवण्याची व्यवस्था होती. परंतु भोजन तयार करण्यासाठी व्यवस्था नव्हती. यामुळे संतापलेल्या यात्रेकरूंनी असंतोष व्यक्त केला. रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांना बोलावून आपली तक्रार केली. परंतु यासंदर्भात आपण काहीच करू शकणार नाही, असे त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परिणामी या विशेष गाडीला शुक्रवारच्या पहाटे ३.५५ वाजता रद्द करण्यात आले. यात्रेकरू रेल्वे स्थानकावरून घरी परतले.या घटनेची माहिती मिळताच खा. नाना पटोले रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यांनी तब्बल तीन तास यात्रेकरूंसाठी दुसऱ्या रेल्वेगडाीची सोय करण्याचा प्रयत्न केला. रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली. परंतु यात तोडगा निघाला नाही. विशेष म्हणजे या गाडीने वैष्णोदेवीची यात्रा करणाऱ्यांमध्ये गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश होता. रेल्वे विभागाखच्या अनागोंदी कारभारामुळे यात्रेकरूंना रात्रभर रेल्वे स्थानकावर राहावे लागले.७ नोव्हेंबरच्या दुपारी फलाट क्र.५ चे निरीक्षण करण्यासाठी आयोजन समितीने मोठ्या प्रमाणात सोय करण्यात आली होती. पाण्याची बॉटल, पाऊच, रजई, गादी व खाण्याचे पदार्थ तिथे आढळले. हे सर्व साहित्य आयोजकांना परत न्यावे लागले. यात्रा आयोजन समितीचे अध्यक्ष रमाकांत अग्रवाल यांच्याशी संपर्क केल्यावर ते म्हणाले, तीर्थयात्री त्या गाडीने यात्रेला गेले असते तर त्यांना खूप त्रास झाला असता. समितीकडून १५०० यात्रेकरूंसाठी रस्त्यात भोजनाची सोय करणे शक्य नव्हते. यामुळे रेल्वेगाडी रद्द करावी लागली. यामुळे समितीला मोठे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. ठराविक कार्यक्रमानुसार यात्रेकरूंसाठी हॉटेल व बसांची बुकिंग या आधीच करण्यात आली होती. त्या बुकिंगचे पैसे मिळणे आता शक्य नाही. (तालुका प्रतिनिधी)