शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांना दिली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST

गोंदिया : देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातही जोमात लसीकरण केले जात आहे. याअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच आता पोलीस ...

गोंदिया : देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातही जोमात लसीकरण केले जात आहे. याअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच आता पोलीस व नगर परिषद कर्मचाऱ्यांनाही लस दिली जात आहे. यासाठी ४२९ कर्मचाऱ्यांची पहिली यादी तयार झाली असून त्यांना शुक्रवारी (दि.५) लस देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आता आणखी लसीकरण केंद्र वाढविले जाणार आहेत.

कोरोना लसीकरणांतर्गत सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असून त्यानुसार त्यांचे लसीकरण सुरू आहे. मात्र यासोबतच अन्य विभागांचाही आता समावेश करून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यात पोलीस व नगर परिषद कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी ४२९ कर्मचाऱ्यांची पहिली यादी तयार असून शुक्रवारपासून त्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे, तर जिल्हाधिकारी कार्यालयातील ४५० कर्मचाऱ्यांची यादी तयार असून आरोग्य कर्मचारी आटोपल्यानंतर त्यांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. विशेष म्हणजे, सध्या लसीकरणासाठी ७ केंद्र सुरू आहेत. शहरासह ग्रामीण भागातील केंद्रांचा यात समावेश आहे.

--------------------

४७१९ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली व तेव्हाच सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असे ठरले होते. त्यानुसार, जिल्ह्यात ८४२८ आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यांचे लसीकरण सुरू आहे. याअंतर्गत आतापर्यंत ४७१९ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकरात लवकर आटोपून त्यानंतर अन्य विभागांच्या लसीकरणाला गती दिली जात आहे.

----------------------------

सोमवारपासून सालेकसा व गोरेगाव येथे केंद्र

जिल्ह्यात सध्या ७ केंद्रांवरून लसीकरण केले जात आहे. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लस देणे गरजेचे असून त्यांचे लसीकरण झाल्यानंतरच अन्य विभागांचा लसीकरणासाठी समावेश करता येणार आहे. शिवाय ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांनाही सोयीचे व्हावे यासाठी आता सोमवारपासून सालेकसा व गोरेगाव केंद्र सुरू केले जाणार असल्याने येथेही लसीकरणाला सुरुवात होणार आहे.