शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

अवकाळीने पावसाने केली पुन्हा धानपिकांची दाणादाण ! कसानीत होणार वाढ, पंचनाम्यात अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:47 IST

Gondia : जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्यात आली. यात सर्वाधिक १ लाख हेक्टरवर हलक्या धानाचे क्षेत्र आहे. सध्या खरीप हंगामातील हलक्या धानाची कापणी जवळपास ८५ टक्के झाली आहे.

गोंदिया : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यानंतर बुधवारी (दि.२९) रात्रीपासून पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर गुरुवारी (दि.३०) दुसऱ्या दिवशी कायम होता. त्यामुळे कापणी केलेल्या धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसाने धानपिकांची दाणादाण केल्याने शेतकऱ्यांवर खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आणि शेतातील बांध्यामध्ये पाणी साचल्याने भिजलेला कडपा बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू असून हे चित्र पाहून डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही एवढी विदारक स्थिती आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्यात आली. यात सर्वाधिक १ लाख हेक्टरवर हलक्या धानाचे क्षेत्र आहे. सध्या खरीप हंगामातील हलक्या धानाची कापणी जवळपास ८५ टक्के झाली आहे. तर काही शेतकऱ्यांची मळणी सुरू आहे. जड धान निघण्यास अजून पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. अशात बुधवार आणि गुरुवारी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने कापणी केेलेल्या आणि शेतातील उभ्या धानपिकाची दाणादाण केली. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कापणी केलेल्याधानाच्या कडपा भिजल्या तर बांध्यामध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर धानपिकाचे नुकसान झाले. तर वादळी पावसामुळे शेतातील उभे धान झोपल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. तर अवकाळी पावसाच्या तावडीत धानपिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच कुटुंबीयांसह केविलवाणी धडपड सुरू आहे.

भिजलेला कडपा वाचविण्याचे संकट

दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील बांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कापणी केलेले धान त्या बुडाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळीच शेतावर धाव घेत पाण्यात बुडालेल्या धानाच्या कडपा बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दोन

बांबूच्या मदतीने त्यावर धानाच्या कडपा टाकून त्या पाऱ्यावर टाकून नुकसान टाळण्याचा शेतकरी प्रयत्न करीत होते. तर कापणी केलेल्या धानाचे भारे भिजल्याने पुंजणे रचण्याची अडचण निर्माण झाली आहे.

धानाला फुटले अंकुर

दोन दिवस कापणी केलेल्या धानाच्या कडपा पाण्याखाली बुडून राहिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानाला अंकुर फुटले आहे. त्यामुळे या धानाची मळणी करुन विक्री करता येणे सुध्दा कठीण झाले असून जनावरे सुध्दा ती खाणार नाहीत अशी स्थिती झाली आहे त्यामुळे केलेला लागवड खर्च भरुन निघणे दूरच असून शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

मजूर मिळणे कठीण, हार्वेस्टरही शेतात जाईना

अवकाळी पावसामुळे भिजलेल्या धानाच्या कडपा पलटविण्यासाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने अख्खे शेतकरी कुटुंबच या कामात व्यस्त असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र आहे. तर अवकाळी पावसाचे संकट कायम असल्याने धानाची लवकर कापणी आणि मळणी करण्यासाठी शेतकरी शेतात हार्वेस्टर नेण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, बांध्यांमध्ये पाणी साचून असल्याने हार्वेस्टर फसत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Untimely Rains Devastate Paddy Crops Again, Farmers Face Increased Losses

Web Summary : Untimely rains in Gondia have severely damaged paddy crops, especially those already harvested. Farmers struggle to salvage soaked crops, facing potential losses, sprouting grains, and difficulty finding labor. Harvestor usage is also hindered due to waterlogged fields, increasing farmer woes.
टॅग्स :FarmerशेतकरीfarmingशेतीRainपाऊस