अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; काम आटाेपून परतणाऱ्या गटसचिवाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 23:48 IST2025-07-16T23:47:48+5:302025-07-16T23:48:23+5:30
विनोद रामनाथ तिजारे असे मृत व्यक्तीचे नाव

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; काम आटाेपून परतणाऱ्या गटसचिवाचा जागीच मृत्यू
गोंदिया: अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गटसचिव ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास तिरोडा-तुमसर मार्गावरील पेट्रोलपंपसमोर घडली. विनोद रामनाथ तिजारे (५४) रा. पालाेरा ता. मोहाडी, जि. भंडारा असे अपघातात ठार झालेल्या गटसचिवाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, विनोद तिजारे हे तिरोडा तालुक्यातील नवेझरी येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत गटसचिव म्हणून कार्यरत आहे. बुधवारी रात्री आपले नियमित काम आटाेपून आपल्या दुचाकीने पालोरो येथे जाण्यासाठी निघाले. दरम्यान तिरोडा-तुमसर मार्गावरील पेट्रोल पंपसमोर अज्ञात वाहनाने तिजारे यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार विनोद तिजारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघात घडल्यानंतर पेट्रोल पंपावरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेची माहिती तिरोडा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. मात्र विनोद तिजारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तिरोडा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.