शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

नोकरी लावून देण्याच्या नावावर बेरोजगारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:38 IST

गोंदिया जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षकाची लावून देण्याच्या नावाखाली एका खासगी कंपनीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्याने १५० बेरोजगार युवक-युवतींची ४४ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार आज (दि.१७) तिरोडा येथे उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देपोलिसांत तक्रार : १५० जणांना फटका ; ४४ लाखांनी फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : गोंदिया जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षकाची लावून देण्याच्या नावाखाली एका खासगी कंपनीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्याने १५० बेरोजगार युवक-युवतींची ४४ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार आज (दि.१७) तिरोडा येथे उघडकीस आली आहे.याप्रकरणी तक्रारकर्ते बेरोजगार युवक-युवतींनी शुक्रवारी पोलीस स्टेशन तिरोडा येथे पुरुषोत्तम सोनेकर, क्षेत्रीय अधिकारी स्ट्राँग सिक्युरिटी कंपनी यांच्या विरोधात तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, स्ट्रांग सिक्युरिटी गार्ड कंपनी बुटीबोरी नागपूरद्वारे गोंदिया जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षक व सुपरवायझर पदावर नोकरीसाठी सोनेकर यांनी तक्रारकर्त्यांकडून प्रत्येकी ३५ हजार रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार तक्रारकर्ते बेरोजगारांनी कंपनीचे चंद्रभागा नाका तिरोडा येथील कार्यालयात जाऊन कंपनीचे क्षेत्रीय अधिकारी सोनेकर यांच्याकडे प्रत्येकी ३५ हजार रुपये जमा करुन त्याची रीतसर पावती घेतली. त्यानंतर बेरोजगारही चार-सहा महिने कंपनी कार्यालयात नोकरीसाठी वारंवार विचारणा केल्यावर त्यांना नोकरीचे आदेश देत असल्याचे सांगून पैसे दिल्याची मूळ पावती २ फेब्रुवारी २०१९ ला परत मागविण्यात आली. त्यानंतर नोकरीचे आदेश बेरोजगारांना देण्यात आले. आदेश घेवून युवक-आरोग्य केंद्रात केले असता सदर आदेश निराधार असून त्यात आपली फसवणूक झाल्याचे युवकांच्या लक्षात आले. यावर बेरोजगारांनी पुन्हा कंपनीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता सदर अधिकाºयांने आदेश नव्याने मंत्रालयातून येणार असल्याचे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. बेरोजगारांनी याप्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्ट्रांग सिक्युरिटी कंपनीचे मुख्य कार्यालय बुटीबोरी नागपूर येथे जावून कंपनीचे संचालक डी.टी.लोहावे यांच्याकडे चौकशी केली असता कंपनी याप्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर बेजरोजगार युवकांनी तिरोडा येथील कंपनीच्या अधिकाºयाकडे दिलेले पैसे परत करण्याची मागणी केली. त्यावर सोनेकर यांनी कंपनीचे संचालक लोहावे यांनाच पैसे दिले असून त्यांचेकडे बोट दाखविले. पुन्हा बेरोजगारांनी कंपनी संचालक लोहावे यांना विचारले असता लोहावे यांनी पावतीची मागणी केली. सर्व प्रकारानंतर बेरोजगार युवकांना आपली पूर्णत: फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आनंदकुमार चौरे देवरी, जि.गोंदिया, विजयसिंह नैकाने महालगाव, दुर्गाप्रसाद डोहरे लांजी (बालाघाट), अनुप मेश्राम एकोडी, दिलीप उके फुटाना ता.देवरी, प्रितकुमार बन्सोड ढाकणी (गोंदिया), वर्षा राजेश हरिणखेडे (तिरोडा), दिक्षीता विकास हुमने गोंदिया, राजेंद्र रिनाईत सेजगाव (गोंदिया) व इतरांनी शुक्रवारी दुपारी पोलीस स्टेशन तिरोडा येथे तक्रार दाखल केली आहे.चौकशीनंतर गुन्हा नोंदविणार-गौतेआरोग्य केंद्रात सुरक्षारक्षकाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली १५० बेरोजगारांना गंडविल्याची तक्रार आज (दि.१७) ला पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. याप्रकरणी चौकशी करुन चौकशीअंती गुन्हा नोंदविला जाईल.- कैलास गौते,पोलीस निरीक्षक तिरोडा

टॅग्स :fraudधोकेबाजी