वाहनाच्या धडकेत दोन युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 21:01 IST2019-04-04T21:01:08+5:302019-04-04T21:01:41+5:30

सानगडी ते साकोली मार्गावरील नर्सरी फाट्यापासून काही अंतरावर एका चारचाकी वाहनाने मोटारसायकल स्वारांना धडक दिल्याने दोन्ही युवक घटनास्थळीच ठार झाले. ही घटना आज (दि.४) दुपारी घडली.

Two youths killed in the vehicle | वाहनाच्या धडकेत दोन युवक ठार

वाहनाच्या धडकेत दोन युवक ठार

ठळक मुद्देसानगडी ते साकोली मार्गावरील घटना : दोघांचा सामूहिक अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : सानगडी ते साकोली मार्गावरील नर्सरी फाट्यापासून काही अंतरावर एका चारचाकी वाहनाने मोटारसायकल स्वारांना धडक दिल्याने दोन्ही युवक घटनास्थळीच ठार झाले. ही घटना आज (दि.४) दुपारी घडली. निखील तुलशीदास मेंढे (२३), गुरुदेव शिवदास कोसरे (२२) रा.खांबी असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहे.
खांबी येथील रहिवासी असलेले निखील मेंढे व गुरुदेव कोसरे हे दोन्ही युवक बजाज बॉक्सर (एमएच ३३ डी ३६३१) या मोटारसायकलने खांबी येथून साकोलीकडे जाण्यासाठी सकाळी ११ वाजता निघाले. सानगडी ते साकोली मार्गावरुन मार्गक्रमण करीत असताना नर्सरी फाटा ते वडद फाटयादरम्यान एका चारचाकी अज्ञात वाहनांने धडक दिली. यात या दोन्ही युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
त्या दोघांना साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अपघाताची वार्ता गावामध्ये पोहोचताच गावचे पोलीस पाटील नेमीचंद मेश्राम व अन्य गावकरी साकोलीला गेले.
अपघातामध्ये ठार झालेल्या दोन्ही युवकांची ओळख पटली. त्यानंतर त्यांचे श्वविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आले.
सामूहिक अंत्यसंस्कार
गावातील दोन होतकरु युवक एकाच ठिकाणी अपघातामध्ये ठार झाल्याने खांबी गावामध्ये सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती. दोघांचीही अंतयात्रा एकत्र काढण्यात आली.गावातील मामा तलावाच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निखीलच्या पश्चात आई, एक भाऊ तर गुरुदेवच्या मागे आई-वडील, दोन भाऊ, दोन बहिणी असा बराच आप्त परिवार आहे.
 

Web Title: Two youths killed in the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात