दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक, दोन ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 20:38 IST2018-11-11T20:38:19+5:302018-11-11T20:38:27+5:30
विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन मोटारसायकलने समोरासमोर धडक दिल्याने दोन जण ठार झाले.

दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक, दोन ठार
सालेकसा : विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन मोटारसायकलने समोरासमोर धडक दिल्याने दोन जण ठार झाले. ही घटना सालेकसा-दरेकसा मार्गावरील नवाटोला गावाजवळ रविवारी (दि.११) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. विकास बद्रीप्रसाद सोनी (२१) रा. टाकरी ता. डोंगरगड (छ.ग.) व शैलेश अर्जुन मारबोदे (२२) रा. रिसेवाडा ता. लांजी (म.प्र.) असे अपघातात ठार झालेल्या मोटारसायकलस्वारांची नावे आहे. प्राप्त माहितीनुसार विकास हा आपल्या मोटारसायकलने डोंगरगडवरून सालेकसाकडे येत होता, तर शैलेश मारबोदे हा सालेकसावरून दरेकसाकडे मोटारसायकलने जात होता. दरम्यान सालेकसा-दरेकसा मार्गावरील नवाटोला गावाजवळ दोन्ही मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही मोटारसायकलस्वारांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या प्रकरणी सालेकसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनात योगेश बिसेन करीत आहेत.