शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेच्या धडकेत दोन शेतकरी ठार

By admin | Updated: October 11, 2014 23:09 IST

रस्त्याच्या कडेला पाण्याचा पंप लावून शेतीला पाणी देत असलेल्या दोन शेतकऱ्यांना रुग्णवाहिकेने धडक दिल्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही शेतकरी साकरीटोला

सालेकसा/आमगाव : रस्त्याच्या कडेला पाण्याचा पंप लावून शेतीला पाणी देत असलेल्या दोन शेतकऱ्यांना रुग्णवाहिकेने धडक दिल्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही शेतकरी साकरीटोला (झालिया) ता.सालेकसा येथील रहिवासी आहेत. दरम्यान मृतांच्या कुटूंबीयांना त्वरित मोबदला मिळावा, तसेच एकाला शासकीय नोकरी देण्याची हमी मिळावी म्हणून संतप्त गावकऱ्यांनी साकरीटोला येथे चक्काजाम केला. त्यामुळे आज दिवसभर आमगाव-सालेकसा मार्गावर वाहतूक सेवा ठप्प झाली होती.संतोष झनकलाल सुलाखे (३२) आणि राहूल दिवाकर जांभुळकर (२२) हे दोघे शेतकरी साकरीटोला-आमगावदरम्यान वाहत असलेल्या काष्टासोडी नाल्याचे पाणी आपल्या शेतीला सिंचन करण्यासाठी पंप लावत होते. रात्री ११ वाजताच्यादरम्यान आमगाववरून सालेकसाकडे जात असलेली १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला टक्कर दिली त्यामुळे रुग्णवाहिकेवरील चालकाचा ताबा सुटला आणि ती सरळ दोन शेतकऱ्यांचा अंगावर गेली, अशी माहिती चालक कृष्णकुमार राधेश्याम क्षीरसागर याने दिले. त्या रुग्णवाहिकेत डॉ.धीरज बहेकार हे सुध्दा बसले होते. काही वेळाने दुसऱ्या रुग्णवाहिकेने त्या जखमींना आमगाव येथील शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्या दोघांना मृत घोषीत केले. दोन शेतकऱ्यांच्या मृत्युमुळे त्यांच्या कुटूंबावर मोठा आघात झाला. गावात एकच शोककळा पसरली, त्यामुळे गावकरी संतप्त झाले. मृताच्या कुटूंबीयांना अंत्यसंस्कारापूर्वी किमान पाच लाख रुपयांची मदत आणि एका सदस्याला शासकीय नोकरीची हमी मिळावी म्हणून गावकऱ्यांनी अंत्यसंस्काराचा कार्यक्रम थांबवून आमगाव-सालेकसा मार्गावर चक्काजाम केला. त्याचप्रमाणे रुग्णवाहिकेत डॉक्टर बसले असूनसुध्दा त्यांनी अपघातानंतर जखमीवर उपचार करण्याचा प्रयत्न केला नाही. एवढेच नाही तर गाडीवरून उतरण्याची माणूसकी सुध्दा दाखविली नाही, असा आरोप करीत अशा डॉक्टरवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी गावातील सर्व महिला-पुरूष रस्त्यावर ठाण मांडून बसून होते. त्यामुळे आमगाव-सालेकसा मार्गावर वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. (प्रतिनिधी/शहर प्रतिनिधी)