गोंदिया जिल्ह्यात सलंगटोला येथील दोन गाईंचा विद्युत धक्क्याने जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:14 AM2020-08-29T11:14:00+5:302020-08-29T11:14:23+5:30

विजेच्या तारेचा धक्का लागून दोन गाईचा मृत्यू झाल्याची घटना 29 ऑगस्ट रोजी गोंदिया जिल्ह्यात ग्राम मुंडीपार येथील सलंगटोला येथे घडली.

Two cows at Salangtola in Gondia district died on the spot due to electric shock | गोंदिया जिल्ह्यात सलंगटोला येथील दोन गाईंचा विद्युत धक्क्याने जागीच मृत्यू

गोंदिया जिल्ह्यात सलंगटोला येथील दोन गाईंचा विद्युत धक्क्याने जागीच मृत्यू

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विजेच्या तारेचा धक्का लागून दोन गाईचा मृत्यू झाल्याची घटना 29 ऑगस्ट रोजी ग्राम मुंडीपार येथील सलंगटोला येथे घडली. या ठिकाणी विद्युत कनेक्शनचे वायर तुटले असता नाईक लाईनमेन यांना सुचना दिली होती. तरी त्यांनी लक्ष न दिल्यामुळे शनिवारी सकाळी दोन गाईचा करंट लागुन जागीच मृत्यू झाला. सदर वायर रस्त्यावर पडली असून येथून वाहतूक होत असल्याने वारंवार सुचना दिल्यानंतर सुद्धा नाईक लाईनमेन यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. सदर लाईनमेन यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Two cows at Salangtola in Gondia district died on the spot due to electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू