शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

तुकडोजी महाराज पुण्यतिथी व वर्षावासाची सांगता

By admin | Updated: November 2, 2015 01:29 IST

शांतिनिकेतन गुरुकूल व गिरिजा ग्रंथालय पिंपळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ नगाजी महाराज ...

विविध धार्मिक कार्यक्रम : हजारोंच्या संख्येत उपासक-उपासिकांची उपस्थितीबोंडगावदेवी : शांतिनिकेतन गुरुकूल व गिरिजा ग्रंथालय पिंपळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ नगाजी महाराज व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.पिंपळगाव येथील विठाई प्रतिष्ठान येथे पुण्यतिथी समारोहप्रसंगी विशेष भक्ती मार्गदर्शक म्हणून हभप उरकुडे महाराज उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य रमेश डोंगरे होते. या वेळी टी.सी. सौंदरकर, सरपंच गोपाल परशुरामकर, धाडू परशुरामकर, डॉ. रामदास परशुरामकर, उपसरपंच समेद लाडे, कृष्णा परशुरामकर, बाळकृष्ण फुलबांधे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सर्वप्रथम संतश्रेष्ठ नगाजी महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्ज्वलन व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन करताना मान्यवर म्हणाले, संतांचे विचार समाजाला प्रेरणादायी ठरणारे आहेत. अव्याहतपणे समाजाला जागृत करून राष्ट्रभिमान जागविण्याचे काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केले. कार्यक्रमासाठी बळीराम उरकुडे, शांता उरकुडे, मोहन उरकुडे, खुशाल उरकुडे यांनी सहकार्य केले.वर्षावासाची सांगताबोंडगावदेवी : निसर्गरम्य स्थळी असलेल्या काळीमाटी येथील बुद्ध विहारात वर्षावासाची सांगता झाली. याप्रसंगी परिसरातील बौद्ध उपासकांनी हजारोंच्या संख्येत उपस्थिती दर्शवून तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीसमोर दीप प्रज्वलन करून पंचाग प्रणाम केले.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव मार्गावरील तसेच स्मृतिशेष भदंत प्रज्ञाज्योती थेरो यांच्या वास्तव्याने श्रद्धेचे स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या काळीमाटी येथील बुद्ध विहारात (दि.३०) वर्षावास सांगता कार्यक्रम घेण्यात आला. वर्षावास समाप्ती सभारंभाला पूज्य भिक्खू दर्शनदीप थेरो, भिक्खू सुगतानंद थेरो, भिक्खू आनंद, श्रामणेर विनयज्योती धम्मोपदेशक म्हणून उपस्थित होते.सर्वप्रथम सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या हजारो बौद्ध उपासक-उपासिकांनी त्रिशरण ग्रहण करून भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर पंचाग प्रणाम करून वंदन केले. आयोजकांच्या वतीने भिक्खू संघाला चिवरदान व भोजनदान दिल्यानंतर उपस्थितांनीसुद्धा लाभ घेतला. तथागतांच्या पंचशील, आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब दैनंदिन जीवनात करावा, असा धम्मोपदेश भिक्खू संघाने दिला. तसेच बुद्धाची शिकवण उत्तम व संस्कारित जीवन जगण्यासाठी पर्याप्त असल्याचे मार्गदर्शन केले.वर्षावास समाप्ती सभारंभासाठी परिसरातील बौद्ध उपासकांनी सहकार्य केले. (वार्ताहर)